दूधासाठी पैसे नसल्याने ‘त्या’ आईने ३ दिवसांपासुन उपाशी असलेल्या ‘दूधपित्या’ बाळाचा गळा ‘घोटला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुलाला दूध पाजण्यासाठी पैसे नसल्याने आईनेच भूक लागल्याने रडत असलेल्या मुलाचा गळा दाबून हत्या केली. उत्तर प्रदेशमधील कनौजमध्ये ही घटना घडली. छिबरामऊ गावात राहणाऱ्या एका गरीब आईने दूधासाठी रडणाऱ्या आपल्या पोटच्या पोराचा आपल्याच हाताने जीव घेतला. तीन दिवसापासून भूकेने व्याकूळ झालेले मूलासाठी आई दूधाची सोय करु शकली नाही. पोलीसांसमोर त्या आईने ही सर्व माहिती दिली. पोलिसांनी आरोपी महिेलेला ताब्यात घेतले आहे.

दूध विकत आणयला नव्हते पैसे
या महिलेची आर्थिक स्थिती ठीक नाही. तीचा नवरा नोकरीसाठी मुंबईला असतो. ही महिला गावातीलच आपल्या घरात ३ मुलांसह राहते. जवळपास राहणाऱ्या लोकांनी सांगितले की रुखसारला ८ महिन्याचा मुलगा अहद तीन दिवसांपासून भुकेला होता. रुखसारकडे मुलाला दूध पाजण्यासाठी पैसे नव्हते. तीन मुले तीला सतत जेवणासाठी काहीतरी मागत होती. रात्री पासूनच अहद दूधासाठी मोठ्याने रडत होता. पुर्ण रात्र रुखसारने त्याला पाणी पाजून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाला होणारा त्रास ती पाहू शकत नव्हती, त्यानंतर गळा दाबून त्यामुलाचा आवाज त्या आईने कायमसाठी बंद केला.

१०० रुपये घेतले होते उधार
काही दिवसांपुर्वी रुखसारने कोणाकडून तरी १०० रुपये उधार घेतले होते. परंतू ती आपल्या मुलांची भूख भागवू शकली नाही. मुलाची हत्या केल्यानंतर ती घरात शांत बसून राहिली. लोकांना याची माहिती मिळाल्यावर तेथे पोलीस देखील दाखल झाले. त्यानंतर रुखसारने पोलिसांना घडलेल्या घटनेची सर्व माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांकडून सांगण्यात आले आहे की ते पुढील तपास करत आहेत. महिलेच्या अडीच वर्षांच्या मुलीने पोलिसांना सांगितले की, आईने भावाची गळा दाबून हत्या केली, आई खूप रागात होती. या घटनेची उच्चाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय