धक्कादायक ! पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापले; मालकाची शेजाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार

कानपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील सुजानपूरमध्ये उघडकीस आला आहे. सोमवारी (दि. 12) ही धक्कादायक घटना घडली असून जखमी कुत्र्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

या प्रकरणी कुत्र्याचे मालक सुरेश सिंह यांनी शेजाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. सिंह यांनी शेजाऱ्यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापल्याचा आरोप केला आहे. कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज आल्यानंतर मी लगेच तिथे पोहचलो. जखमी अवस्थेत कुत्रा पडला होता. त्याला तात्काळ पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे सिंह यांनी सांगितले. रसुलाबाद पोलिसांनी सांगितले की, सिंह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी कुत्र्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तक्रारदाराने केलेल्या आरोपा तथ्य असल्यास आणि त्यात खरेच कुणी दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.