Made In China च्या विरुद्ध UP पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, मोबाइलमधून ‘Remove China Apps’ चा दिला आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि चीन यांच्या सीमेवर वाढत्या वादानंतर यूपी पोलिसांनी शुक्रवारी मोठे पाऊल उचलले आहे. या भागातील आयजी एसटीएफ, अमिताभ यश यांनी मोबाइलवरून चिनी अ‍ॅप काढण्याचे आदेश दिले आहे. आता टीकटॉक, यूसी ब्राउझर सारखे कथित चिनी अ‍ॅप मोबाइलमध्ये हटविले जातील. गुगल प्ले स्टोअरमधील ‘रिमूव्ह चाइना अ‍ॅप’ काही आठवड्यांत 5 लाखापेक्षा जास्त वेळा डाऊनलोड केले गेले होते. या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्स चीनचे मोबाइल अ‍ॅप्स सहज शोधू शकत होते.

सीमेचा वाद वाढल्यामुळे भारताच्या विविध सोशल मीडियावर चिनी अ‍ॅप्स हटविण्याचे आवाहन करण्यात आले होते. यूपी एसटीएफचे आयजी अमिताभ यश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 52 चीनी अ‍ॅप्सना मोबाईलमधून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ते म्हणाले की, या अ‍ॅप्समधील वैयक्तिक व इतर डेटा चोरीला गेल्याचा संशय असल्याने टिकटॉक, यूसी ब्राउझर आणि हॅलो यासह अन्य अ‍ॅप्स त्वरित हटवावेत.

चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या मोहिमेमध्ये बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग यामुळे बरीच बळकटी मिळेल. भारतीय ग्राहकांच्या आवडीला प्रभावित करुन देशाच्या किरकोळ बाजारावर अधिकाधिक नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने आणि विचार करुन रणनितीच्या अंतर्गत चिनी कंपन्यांनी भारतीय सेलिब्रिटींद्वारे त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करण्याचा कट रचला. जे समजणे फार महत्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनशी सुरू असलेल्या वादामुळे बरेच लोक चिनी वस्तू व मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सच्या बहिष्काराचे समर्थन करत आहेत.