UP : योगींच्या काळात बदलणार भिकाऱ्यांची ‘LifeStyle’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर योगी आदित्यनाथ नवीन योजना आणून जनतेप्रमाणेच समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. योगी सरकार आता भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार आहेत. यासाठी सरकार लखनऊमध्ये एक मोठा प्रकल्प उभा करणार आहे. यासाठी सरकारने महापालिकेला आदेश दिले आहेत. राजधानीमधील सर्व भिकाऱ्यांना पकडून त्यांना आश्रयगृहात ठेवून त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

लखनऊ महापालिकेचे आयुक्त इंद्रमणि त्रिपाठी यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि, बुधवारपासून यासाठी आठ झोनमध्ये सर्वे केला जाणारा सून यामध्ये सर्व भिकाऱ्यांना क्रमांक दिले जाणार असून त्यानंतर त्यांना घरातून थेट कचरा उचलणे, नाले आणि रस्त्यांची सफाई यांसारख्या कामांना त्यांना जोडले जाणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना त्यानी सांगितले कि, या दैनंदिन कार्यात सहभागी होणाऱ्या या लोकांना प्रतिदिन २५० रुपये रोजगार दिला जाणार आहे. त्यामुळे ते स्वतः काम करून खाऊ शकतील आणि स्वयंपूर्ण बनतील.

पेंशन सुविधा

आयुक्तांनी पुढे सांगितले कि, जे लोकं शारीरिक दृष्ट्या स्वस्थ आहेत त्यांना शहरातील जवळपास ६ लाख घरांतील कचरा गोळा करण्याचे काम दिले जाणार आहे. त्याचबरोबर शारीरिक दृष्ट्या अपंग असणारे भिकारी आश्रयगृहात ठेवले जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांना समाज कल्याण विभागाद्वारे पेन्शन आणि इतर सुविधांचा लाभ मिळवून देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लखनऊमध्ये जवळपास ४०० ते ५०० भिकारी आहेत.

पाच रुपयांत जेवण

त्याचबरोबर या भिकाऱ्यांना पाच रुपयांत जेवण देण्याची देखील योजना सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर दिव्यांग लोकांना रेशनकार्ड तसेच पेन्शन देण्याची योजना असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच या आश्रयगृहात पाणी, शौचालय, त्याचप्रमाणे झोपण्यासाठी चादर देखील उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

लाकडी कंगवा कमी करतो ‘केसाच्या’ तक्रारी

किचनमधील ‘या’ वस्तू करतील जखमांवर जालीम उपाय

महिलांनी ‘या’ गोष्टी टाळणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक

नेहमी तरुण राहण्यासाठी करा ‘हे’ पाच सोपे उपाय

आदिवासींसाठी स्वतंत्र आरोग्य संस्था असायला हवी

‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामात भ्रष्टाचार, सभापतींचे चौकशीचे आदेश

 

You might also like