‘बाईक’साठी त्यानं गर्भवती पत्नीला लावलं जुगाराच्या डावावर, पुढं झालं ‘असं’ की त्याची ‘भंबेरी’ उडाली

लखनऊ : वृत्तसंस्था – हल्ली लोक जुगाराच्या नशेत काय करतील याचा काही नेम नाही. अशीच एक घटना उत्तरप्रदेश राज्यातील लखनौ शहरात घडली असल्याचे वृत्त समोर आले आहे. खरं तर कलियुगातले पती काय करतील याचा काहीही नेम नसताे. इतिहासात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत ज्यात पत्नीकडे केवळ वस्तूसारखे पहिले गेल्याचे आपणास दिसते. महाभारतातही युधिष्टिराने द्रौपदीला जुगारात हरल्याचे उदाहरण सर्वश्रुत आहे.

उत्तरप्रदेशात घडलेले हे कृत्यही घाणेरडेपणाचा कळसच म्हणावा लागेल. एका भौतिक गोष्टीच्या हव्यासापोटी पतीने अक्षरशः आपल्या धर्मपत्नीची जुगारात बोली लावली. पतीने केलेलं हे घाणेरडं कृत्य माहिती होताच महिलेनं खूप गोंधळ घातला आणि ती आपल्या माहेरी निघून गेली.

अनेक ठिकाणी लग्नामध्ये गाडी वैगेरे भेट देणे ही एक नवीन परंपराच पडली आहे. गाडी न मिळाल्यास अनेकवेळा सासरच्यांकडून त्यासाठी सातत्त्याने मागणी केली जाते. त्यासाठी कधी-कधी आपल्या पत्नीलाही त्रास दिला जातो. या प्रकरणातील आरोपी पतीचं नाव विपिन असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्यांनी आपल्या लग्नात बाइक न दिल्यानं विपिननं काही दिवसांपूर्वी बाइकसाठी जुगाराचा डाव खेळला. आश्चर्याची बाब म्हणजे या खेळात त्यानं स्वतःच्या बायकोलाच पणाला लावलं आणि हा डाव तो हरला.

यानंतर विपिननं पत्नीला जुगारात जिंकलेल्या व्यक्तीसोबत जाण्यास सांगितलं तेव्हा तिनं गोंधळ घातला. कारण जिंकणारी व्यक्ती विपिनच्या पत्नीसोबत जबरदस्ती करू लागली. त्या वेळी तेथून महिलेनं कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि थेट माहेर गाठलं. घरी पोहोचताच तिनं नवऱ्यानं केलेला प्रकार कुंटुबीयांना सांगितला. यापूर्वीही विपिननं बाईकसाठी पत्नीला मारहाण करत घराबाहेर काढलं होतं. हे सारं काही त्यानं पत्नी गर्भवती असताना केलं. विपिनच्या छळाला कंटाळून शेवटी महिलेने तहसील एसडीएम मध्ये तक्रारही नोंदवली.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like