नवविवाहित महिलेनं लग्नाच्या तिसर्‍या दिवशी गळफास घेऊन केली आत्महत्या, ड्रेसिंग टेबलवर लिपस्टिकनं लिहीला मेसेज्

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुजफ्फरनगरमधील चरथावळ येथे दोन दिवसांपूर्वी नवविवाहित वधूने तिच्या सासरच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी वडील व इतर नातेवाईक जेव्हा सासरच्या घरी पोहोचले तेव्हा या घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर तेथे खळबळ उडाली.

चरथावल पोलीस स्टेशन परिसरातील कुटेसराच्या मोहल्ला शंकर पट्टी येथे राहणाऱ्या शरणदास यांचा मुलगा सचीन सैनी यांनी घरातच टीव्ही दुरुस्तीचे दुकान सुरु केले होते. सचिनचा 29 जून रोजी शामली जिल्ह्यातील झिंझाना पोलिस स्टेशन परिसरातील नागौर गावात राहणाऱ्या नेहाशी विवाह झाला होता. कोरोना विषाणूमुळे साधेपणाने हा विवाह पार पडला, त्यानंतर नेहा त्याच दिवशी संध्याकाळी कुटेसरा येथील सचिनच्या घरी आली. तिचा पाय दुखत असल्याचे सांगून नेहा बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास खोलीत गेली. तेथून तिने आपल्या वडिलांना बोलावून आपल्या सासरच्या घरी येण्यास सांगितले व खोलीचा दरवाजा आतून बंद केला. दुपारी नेहाचे वडील नातेवाईकांसह कुटेसरा येथे पोहोचले.

जेव्हा खोलीच्या बाहेरुन सतत आवाज देऊनही कोणतीच हालचाल ऐकू आली नाही तेव्हा कुटुंबियांनी दरवाजा तोडला असता नेहाचा मृतदेह पंखावर लटकलेला आढळला. तिने आपल्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

नुकतेच लग्न झालेल्या नववधूचा मृतदेह पाहून कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह खाली घेऊन मोर्चरीत पाठवला आणि पती सचिन आणि सासरे शरणदास यांना ताब्यात घेतले. सचिन सैनी आणि त्याचे वडील शरण दास यांना ताब्यात घेण्यात आल्याचे एसओ सुबेसिंग यांनी सांगितले. नववधूच्या माहेरच्या लोकांनी जर तक्रार दिली तर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल.