वडीलांचा खून करून मृतदेह ठेवला बॉक्समध्ये लपवून, आई रात्रभर बघत होती वाट

मुरादाबाद : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली. कुंदनपूर परिसरातील एक वृद्ध व्यक्ती शुक्रवार पासून बेपत्ता होती. या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह शनिवारी त्याच्या घरात एका बॉक्स आढळून आला. सकाळी मृत व्यक्तीच्या पत्नीने बॉक्समध्ये पतीचा मृतदेह पाहिला त्यावेळी तिला मानसिक धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धवा घेत मयत महेंद्र यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

शहर पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार, या घटनेचा तपास सरु असून मृत व्यक्तीचा मोठा मुलगा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मृत व्यक्तीचा मोठा मुलगा विक्की यानेच खून करून मृतदेह बॉक्समध्ये लपवून ठेवल्याचा संशय घरच्यांना आहे. मयत महेंद्र आणि त्याची पत्नी मझोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंदनपूर येथे राहतात. महेंद्र आणि त्याची पत्नी हात गाडीवर भाजी विक्री करण्याचा व्यावसाय करतात. महेंद्रच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सकाळी ती भाजीची गाडी लावून घरी परत आली तेव्हा घरात नातवंडे होती. यावेळी नातवंडे रडत होती आणि पती महेंद्र घरात नव्हता. त्यामुळे तिने पतीचा शोध घेतला पण ते सापडले नाहीत.

त्यांचा धाकटा मुलगा ज्या कंपनीत कामाला जातो त्याला घरी बोलावून घेत महेंद्रची चौकशी केली. नातेवाईकांशी संपर्क करून त्यांच्याकडे चौकशी केली. शनिवारी सकाळ पर्यंत महेंद्र यांची कोणतीच माहिती नातेवाईकांना मिळाली नाही. यानंतर नातेवाईकांनी महेंद्र स्वत:हून घरी परत येईल अशा आशेवर त्याची रात्रभर वाट पहात राहिले. शनिवारी दुपारी नातेवाईकांना घरात ठेवलेल्या एका बॉक्समधून हात बाहेर आल्याचे दिसताच एकच गोंधळ उडाला.

स्थानिक लोकांना बोलावून घेत नातेवाईकांनी बॉक्समध्ये असलेला मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी त्यांना हा मृतदेह बेपत्ता असलेल्या महेंद्रचा असल्याचे समजले. नातेवाईकांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या धाकटा मुलगा बंटी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून मोठा मुलगा शुक्रवारपासून फरार आहे. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांकडे केलेल्या चौकशीमध्ये, मृत व्यक्तीचा मोठा मुलगा विक्की आणि नातेवाईकांशी पटत नव्हते. तो सतत कोणत्या ना कोणत्या कराणावरून भांडत होता. नातेवाईकांनी विक्कीनेच खून केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. विक्की फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.