आई-बहिणीसोबत अश्लील चाळे, सुपारी देवुन संपवलं

मेरठ : वृत्तसंस्था – बहीण-आईसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या मुलाची हत्या करण्यात आली असून त्याच्या आईनेच ५० हजार रुपयांची ‘सुपारी’ दिली. याप्रकरणी पोलिसांनी त्याची आई व दोन सुपारी किलर या दोघांना अटक केली आहे. हत्येनंतर सहा तासांच्या आत पोलिसांनी याचा छडा लावला. हि घटना मेरठ येथील लिसाडी गेट परिसरात घडली आहे.

परवेज (वय २२) याची गुंडांनी बुधवारी रात्री उशिरा गोळ्या घालून हत्या केली होती. पोलीस लिसाडी गेट घटनास्थळी पोहोचले. दोन गुंड दुचाकीवर आले होते. टेरेसवर झोपलेल्या परवेजला गोळ्या घालून ठार करून ते घटनास्थळावरून पसार झाले होते, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी परवेजची आई व बहिणीची स्वतंत्र चौकशी केली. यावेळी दोघींच्या जबाबात विरोधाभास दिसून आला. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. याप्रकरणी त्यांनी परवेजच्या आईला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सहा तासांनंतर तिने धक्कादायक माहिती दिली. परवेजची हत्या घडवून आणली होती. परवेजला ठार मारण्याची सुपारी त्याच्या आईनेच दिली होती. त्यासाठी तिनं गुंडांना ५० हजार रुपये दिले होते. त्यांनी परवेजची गोळ्या घालून हत्या केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा परवेज अश्लिल चाळे करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलल्याची कबुली त्याच्या आईने दिली. परवेज आईला गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून अत्याचार करत होता. तो लहान बहिणीसोबतहि अश्लिल चाळे करत होता. अनेकदा परवेजला आई-बहिणीने समजावलं होतं. मात्र, त्याचे वागणं बदललं नाही. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर तिने (आईने) गुंडांना सुपारी देऊन त्याची हत्या घडवून आणली.

सुपारी किलर तन्वीर हा या महिलेच्या जावयाचा भाऊ आहे. या घटनेच्या तीन दिवस आधी महिलेने तन्वीरला आपल्या घरी बोलावले होते. त्यानंतर तन्वीरने सुपारी किलरला गाठले. त्यानंतर परवेजची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपी महिलेसह दोन्ही सुपारी किलरना देखील अटक केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like