समाजवादी पार्टीचे ‘सुप्रीमो’ मुलायम सिंह यादव ‘कोरोना’ संक्रमित, पत्नी साधना गुप्ता यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि मैनपुरीचे खासदार मुलायमसिंह यादव आणि त्यांची पत्नी साधना गुप्ता यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलायमसिंग यादव आणि त्यांच्या पत्नीची श्वास घेण्याच्या तक्रारीनंतर लखनऊच्या खासगी रुग्णालयात कोरोना तपासणी करण्यात आली. दोघांचाही अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांना गुडगावच्या मेदांतामध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलायमसिंह यादव यांना कोरोनाची कोणतीही विशेष लक्षणे नाही, तसेच धोक्याचे कोणतेही कारण नाही.