Uttar Pradesh News | धक्कादायक ! गोवऱ्यांमधून निघालेल्या विषारी वायूमुळे चौघांचा मृत्यू

मोरादाबाद : वृत्तसंस्था (Policenama Online) –  गोवऱ्यांमधून निघत असलेल्या विषारी वायूमुळे (Toxic gas) श्वासोच्छवासात अडचणी आल्याने चौघांचा मृत्यू (Death of four) झाला आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) दिलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजपूर केसरिया गावात सोमवारी (दि. 21) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृतात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. Uttar Pradesh News | uttar pradesh 4 die after inhaling toxic gas released dung cakes

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

राजेंद्र (वय 50), त्यांचे मुले हरकेष (वय 30) प्रितम (वय 25 ) आणि त्यांचा नोकर रमेश (वय 40) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सिमेंट दुकानाच्या बेसमेंटमध्ये चौघांचे मृतदेह आढळले आहेत.
मृतापैकी तिघे एकाच कुटुंबातील आहेत. अर्धवट सुकलेल्या गोवऱ्यांमुळे निघालेल्या विषारी वायूमुळे हा प्रकार घडल्याची माहिती मोरादाबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक पवन कुमार यांनी दिली.
राजेंद्र आणि त्यांची मुले हरकेष, प्रितम आणि त्यांचा नोकर रमेश सोमवारी रात्री सिमेंट दुकानात काम करत असताना हा प्रकार घडला.
रात्री 11 वाजता राजेंद्र यांची पत्नी त्यांना बोलवायला आली.
मात्र तिने वांरवार हाका मारूनही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर तिने पोलिासांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बेसमेंटमध्ये जाऊन पाहणी केली.
त्यावेळी त्यांना चौघांचे मृतदेह आढळून आले.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून तपास सुरु केला आहे.

Web Title : Uttar Pradesh News | uttar pradesh 4 die after inhaling toxic gas released dung cakes

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

राजकीय दबावातून वन रूपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुलेंचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रचंड खळबळ