‘प्रदूषणाच्या नावाखाली फटाक्यांसंदर्भात जास्त ज्ञान पाजळू नका’

लखनऊ : वृत्तसंस्था – “कोरोना संसर्ग झाल्यामुळे होम आयसोलेशनमध्ये असणारे उत्तर प्रदेशमधील उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी दिवाळीतील फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. साक्षी महाराज यांनीही फेसबुकवर पोस्ट करत प्रदूषणाच्या नावाखाली फटाक्यांसंदर्भात जास्त ज्ञान पाजळू नका,” असं म्हटले आहे.

साक्षी महाराज यांनी बकरी ईद आणि दिवाळीची तुलना करताना, “ज्या दिवशी बकरीशिवाय बकरी ईद साजरी होईल त्या दिवशीच फटाक्यांशिवाय दिवाळीसुद्धा साजरी केली जाईल. प्रदूषणाच्या नावाखाली फटक्यांसंदर्भात जास्त ज्ञान पाजळू नका,” असे म्हणत टोला पोस्टद्वारे लगावला आहे.

साक्षी महाराज हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी कायमच चर्चेत असतात. त्यांनी फेसबुकवर केलेली ही फटाक्यांच्या बंदीविरोधातील पोस्ट सध्या व्हायरल झाली असल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.