भारतात ‘या’ ठिकाणी भाडेकरूंकडून 1 महिने किराया मागण्यावर बंदी, आदेशाचं उल्लंघन केल्यास घरमालकाला जेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील नोएडा येथे राहणाऱ्या भाडेकरूंना मोठा दिलासा देत नोएडाच्या डीएमने एक मोठे पाऊल उचलले आहे. नोएडाच्या डीएमने शहरातील सर्व घर मालकांना एका महिन्यासाठी भाडेकरूंकडून भाडे न घेण्याचे आदेश दिले आहेत. नोएडा आणि आसपासच्या भागातून मोठ्या संख्येने लोक स्थलांतरित झाल्याच्या पार्श्वभूमीवर नोएडा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. नोएडाच्या डीएमच्या आदेशात असेही म्हटले आहे की, जर घर मालकाने हा आदेश स्वीकारला नाही तर दंड आणि 2 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.

नोएडाच्या डीएम यांनी हा आदेश आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर केल्यानंतर दिला आहे आणि म्हंटले कि, गौतम बुद्धनगरमधील कोणत्याही इमारतीच्या मालकाने कोणत्याही कामगार किंवा कर्मचार्‍यांकडून, जे जिल्ह्यातील विविध युनिट्स, कंपन्या, कार्यालयांमध्ये कार्यरत आहे, त्यांच्याकडून कोणत्याही परिस्थितीत एका महिन्याचे भाडे घेऊ नये. ऑर्डर जारी केल्याच्या तारखेपासून म्हणजेच 28 मे रोजी एका महिन्यानंतर भाडे वसूल केले जाऊ शकते.

या आदेशानुसार एखाद्या इमारतीचा मालक त्याचे उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर कायद्यान्वये दंडात्मक कारवाई केली जाईल ज्यामध्ये 1 वर्षाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीची तरतूद असेल. तर त्याचे उल्लंघन केल्यास कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाले असेल. तर शिक्षा 2 वर्षे देखील असू शकते. ऑर्डरमध्ये एक फोन नंबर देखील देण्यात आला आहे ज्यात म्हटले की जर एखाद्या मालकाने भाडेकरूला भाड्यासाठी त्रास दिला तर त्याची 0120-2544700 या फोन नंबरवर तक्रार दिली जाऊ शकते.