संतापजनक ! पंचायतीने ठरवली अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची किंमत, पंच म्हणाले – ’50 हजार घ्या, 5 चप्पल मारा आणि बंद करा प्रकरण’

महाराजगंज : वृत्त संस्था – उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) च्या महराजगंजमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील गावात एक अल्पवयीन मुलगी एका नराधमाच्या वासनेला बळी पडली. प्रकरण पंचायतीमध्ये पोहचले, तेव्हा आरोपीला कठोर शिक्षा देण्याऐवजी अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारा (Rape) ची किंमत ठरवण्यात आली. पंचायती (Panchayat) ने आपला निर्णय सुनावला की, 50 हजार रुपये दंड घेऊन प्रकरण बंद करून टाकावे. यासोबत पंचांनी पीडितेला सांगितले आरोपीला पाच चप्पल मारून आपला राग शांत करावा.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

पोलिसांनी नोंदवला किरकोळ छेडछाडीचा गुन्हा
पीडितेने आरोपीला पंचांनी सांगितलेली शिक्षासुद्धा दिली परंतु तिला आणि तिच्या कुटुंबाला वाटले की, हा काही न्याय नाही. त्यामुळे दुसर्‍या दिवशी ते पोलिसांकडे पोहचले. आरोप आहे की पोलिसांनी सुद्धा कठोर कारवाई करण्याऐवजी छेडछाडीचा किरकोळ गुन्हा नोंदवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. नंतर प्रकरण एसपीपर्यंत पोहचले तेव्हा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेनंतर नराधम फरार
हे प्रकरण महाराजगंजच्या कोठीभार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. 23 जूनच्या सायंकाळी सहा वाजता 13 वर्षांची पीडित मुलगी आपल्या शेतात भाजी तोडण्यासाठी गेली होती. यावेळी गावातीलच एक तरूण तिथे पोहचला आणि त्याने अगोदर तिची छेडछाड केली. मुलीने विरोध केल्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. घटनेनंतर हा नराधम फरार झाला.

भेदरलेली मुलगी त्याच अवस्थेत कशीतरी घरी पोहचली. तिने आपल्या कुटुंबातील लोकांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबिय तरूणाच्या घरी तक्रार घेऊन गेले. परंतु आरोपीच्या घरच्यांनी तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्यांच्याशी अरेरावी करत पळवून लावले.

आरोपीचे कुटुंबिय नरमले
यानंतर पीडित कुटुंबाने गावच्या पंचायतीकडे धाव घेतली. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून आरोपीच्या घरच्यांनी सुद्धा नरमाई दाखवली आणि पंचायतीने पीडितेच्या वडीलांना 24 जूनरोजी प्रकरणात न्यायासाठी बोलावले. आणि नंतर बलात्काराची किंमत ठरवणारा तो माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला.

प्रकरण एसपी प्रदीप गुप्ता (SP Pradeep Gupta) यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांनी दिले स्पष्टीकरण
या प्रकरणात कोठीभार पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक धनवीर सिंह यांचे म्हणणे आहे की, बलात्काराचे प्रकरण छेडछेड म्हणून दाखल केल्याचा आरोप निराधार आहे. प्रकरण पोलीस ठाण्यात येण्यापूर्वी पंचायत झाल्याची बाब समोर आली आहे. आरोपी गावातून फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे.

मेडिकल रिपोर्टनंतर पुढील कारवाई
पीडित मुलीच्या वडीलांच्या सांगण्यावरूनच आरापीविरूद्ध छेडछाड आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली जात आहे.
मेडिकल रिपोर्टच्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : panchayat justice in minor girl rape case in mahrajganj
5 hits by slippers to accused 50 thousand compensation

हे देखील वाचा

Amrita Fadnavis | लसीकरणाची आकडेवारी देत अमृता फडणवीसांचे ट्विट, म्हणाल्या – ‘हो, मी भक्त अन् त्याचा मला अभिमान’

विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याला डॉक्टरांनी वाचविले ‘प्राण’; पण त्याने खिडकीतून उडी घेऊन केली ‘आत्महत्या’

OBC Reservation | ओबीसी आरक्षणाला भाजपचा नेहमीच विरोध; एकनाथ खडसेंची भाजपसह देवेंद्र फडणवीसांवर टीका