खळबळजनक ! ‘ड्यूटी सिस्टीम’ला वैतागून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

अमरोहा (युपी) : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील धनौरा पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहलेल्या चिठ्ठीमध्ये पोलिसांच्या कामाच्या पद्धतीमुळे आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. तसेच पोलिसांच्या कामाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करून माझ्या सारख्या मनाने खचलेल्या इतर कर्मचाऱ्यांची यातून सुटका करून त्यांचे प्राण वाचवावेत. तसेच माझा जीव व्यर्थ जाऊ नये असे चिठ्ठीत लिहले आहे.

ही चिठ्ठी त्याने पोलीस महासंचालकांच्या नावे लिहली आहे. पंकज बालियान (रा. मुजफ्फरनगर) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पंकज याने पोलिसांच्या कार्यपद्धतीला आपण स्वत:च जबाबदार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पंकजने आत्महत्या केल्याची तक्रार त्याच्या वडीलांनी केली आहे. पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो दोन दिवसांपूर्वी सुट्टीवरून कामावर हजर झाला होता. त्याची ड्युटी रामलीला मैदानवर लावण्यात आली होती. तो पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या एका घरामध्ये त्याच्या इतर पोलीस मित्रांसोबत राहत होता.

सोमवारी रात्री उशीरा घरी आला. मात्र, सकाळी त्याने खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याच्या सोबत राहणाऱ्या मित्रांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता पंकज लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या खिशामध्ये मृत्यूपर्वी लिहलेली चिठ्ठी सापडली आहे. ही चिठ्ठी त्याने पोलीस महासंचालकांच्या नावे लिहली असून त्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
पोलीस महासंचालक विजय भूषण यांनी सांगितले की, त्याच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीची तपासणी करण्यात येत आहे. कामाच्या तणावामुळे त्याने आत्महत्या केली नसावी. कारण त्याच्याबरोबर इतरही कर्मचारी काम करतात. त्याने कदाचीत घरगुती कारणास्तव आत्महत्या केली आहे का हे देखील पडताळून पाहिले जाईल.

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय

Loading...
You might also like