‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर विमानानं लखनऊला गेला रूग्ण, पुन्हा पोहचला गावात, प्रकृती बिघडल्यानंतर प्रचंड खळबळ

पोलिसनामा ऑनलाइन : एका बाजूला प्रशासन कोरोनाबद्दल काळजी घेत असून नागकरिकांनाही काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. पण अशात देखील काही महाभाग मनात येईल तसं वागताना दिसत आहे. जर तुम्हाला कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर लगेच जवळील रुग्णालयात तपासून घेण्यास सांगीतले जात आहे. पण याचा काहीही उपयोग होताना दिसत नाहीये. असाच एक किस्सा उत्तरप्रदेश मधील प्रतापगड या जिल्ह्यात घडला आहे. या घटनेने आरोग्य विभाग आणि प्रशासनाची झोप उडाली आहे.

झालं असं की, प्रतापगड जिल्ह्यातील गुडरू गावात एक कोरोनाचा रुग्ण मिळाला आहे. हा व्यक्ती 23 जुलैला पुण्यातून आला आहे. 25 तारखेला तब्येत बिघडल्यामुळे चेक केलं असता त्याला कोरोना असल्याचं उघडकीस झालं. विशेष म्हणजे या व्यक्तीने पुण्यात 18 तारखेला एका खाजगी लॅबमध्ये कोरोनाची टेस्ट केली होती आणि 22 तारखेला ती टेस्ट पॉसिटीव्ह आली होती. अशातच त्याने 23 जुलैला पुणे सोडलं आणि विमानाने पुण्याहून लखनऊला आला आहे. तिथून तो बसने आपल्या गावी जाऊन घरीच कॉरंटाइन झाला होता. तब्येत बिघडल्यावर आरोग्यसेवक गेले असता त्याने सांगितले की, त्याला कोरोना झाला आहे.

हा व्यक्ती पुण्यात एक खाजगी कंपनीत मॅनेजर आहे. आता प्रतापगढ आरोग्य प्रशासन या व्यक्तीची ‘ट्रॅव्हल हिस्टरी’ काढत आहेत. त्या व्यक्तीने विमान आणि बसने प्रवास केला असल्यामुळे प्रशासनासमोरची काळजी चांगलीच वाढली आहे. प्रतापगढमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 247 रुग्ण सापडले आहेत त्यातील 147 नीट झाले असून 11 लोकांचा मृत्यू झाला आहे.