समाजवादी पार्टीचे खा.आजम खानांच्या विरोधात ED कडून FIR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समाजवादी पार्टीचे नेते आणि खासदार आजम खान यांच्या अडचणी आता वाढत चालल्या आहेत. रामपूरमधील शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणे आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता सक्तवसुली संचलनालयाने (ED) केस दाखल केली आहे. मागील काही दिवसांपासून आजम खान यांच्या विरोधातील प्रकरणांची तपासणी करण्यात येत आहे, ज्यावर कारवाई करत खटला दाखल केला आहे.

आजम खान यांना भूमाफिया घोषित केल्यानंतर २७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्याचा आरोप आहे. रामपूरच्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे.

आजम खान जौहर यूनिवर्सिटीचे संस्थापक आहेत. या विद्यापीठाची एसआयटीकडून तपासणी करण्यात आली. याशिवाय यूपीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आजम खान यांच्या मौलाना मोहम्मद अली जौहर विद्यापीठाच्या आतून जाणाऱ्या सार्वजनिक मार्गावरील अवैध ताबा हटवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तर उपजिल्हाधिकारी रामपूरचे प्रेम प्रकाश तिवारी यांनी दंडाच्या रुपात आजम खान यांच्यावर ३ कोटी २७ लाख ६० हजाराचा दंड ठोठावण्यात आला.

याशिवाय, रामपूर जिल्हा प्रशासनाने खासदार आजम खान यांच्या हमसफर रिसॉर्टवर बुलडोजर चालवण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे, ज्यात सांगण्यात आली आहे, त्यांनी सिंचन विभागाच्या एक हजार यार्डवर अवैधपणे ताब्यात घेतले आहे.

जिल्हा प्रशासन आजम खान यांच्या भोवती फास आवळण्यात येत आहेत. पाच दिवसांआधी त्यांच्याच जौहर यूनिवर्सिटीचे गेट तोडण्याचे आदेश देण्यात आले होते. आता आजम यांच्या हमसफर रिसॉर्ट देखील प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला आहे. जिल्हाधिकारी आन्जनेय कुमार सिंह यांनी सांगितले की त्यांनी हमसफर रिसॉर्टमध्ये एक हजार यार्ड जमीन ताब्यात घेण्यात आला आहे. आजम खानवर पहिल्यांदाच अजीमनगर ठाण्यात जमीन ताब्यात घेण्यावरुन २७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –