6 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करणार्‍यावर ‘दबंग’ IPS अजय पाल शर्मांनी घातल्या गोळ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात महिलांवर मोठया प्रमाणात अत्याचार होत असतात. यात लहान मुलींचा देखील समावेश असतो. लैंगिक अत्याचार आणि बलात्कार यांसारख्या घटना भारत मोठ्या प्रमाणावर घडत असताना या प्रकरणांत गुन्हेगारांना शिक्षा मिळण्याचे प्रमाण फार कमी आहे.

मात्र आता या प्रकरणात पोलिसांनी देखील कडक भूमिका घेत आरोपींना लवकरात लवकर अटक आणि शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. अशाच प्रकारची एक घटना उत्तरप्रदेशातील रामपुरमध्ये घडली आहे. बलात्कार आणि हत्येचा आरोप असणाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिस अटक करण्यासाठी गेल्यानंतर आरोपीने पोलिसांवरच गोळीबार केला.

परंतु, रामपूरचे पोलिस अधीक्षक आणि एनकाऊंटर स्पेशलिस्ट अजय पाल शर्मा यांनी या चकमकीत आरोपीच्या दोन्ही पायांवर गोळ्या मारल्या. त्यामुळे आरोपीला पकडण्यात पोलिसांना शक्य झाले. त्यानंतर आरोपीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नाजिल असे या आरोपीचे नाव आहे. त्याने सहा मे रोजी एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून हत्या केली होती. त्यानंतर सुमारे दीड महिना पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र पोलिसांना चकवा देऊन तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मृतदेह सापडल्यानंतर सर्व स्तरातून पोलिसांवर टीका होत होती.

त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. ७ मे रोजी या प्रकरणाची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली होती. आरोपीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्याला पकडायला गेले असता त्याने पोलिसांवर गोळीबार केला असता अजय पाल शर्मा यांनी त्याच्या पायावर गोळ्या झाडत त्याला अटक केली.

दरम्यान, या प्रकरणानंतर पोलिस अधीक्षक अजय पाल शर्मा यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी देखील आपल्या ट्विटर अकाउंटवरून याची माहिती दिली.

आरोग्य विषयक वृत्त

जरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन

Loading...
You might also like