UP मध्ये मीठ घोटाळा, योगी सरकारमधील मंत्री प्रकाश निषाद यांच्या चौकशी तयारी करताहेत पोलिस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील पशुधन घोटाळ्यानंतर अधिकारी आणि मंत्र्यांच्या संगनमताने आणखी एका घोटाळ्याचा सुगावा लागला आहे. अन्न व पुरवठा विभागाला मीठाचा पुरवठा करण्याचे कंत्राट देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकीत पशुधन राज्यमंत्री जय प्रकाश निषाद यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. माहिती गोळा करण्यासाठी पोलिस राज्यमंत्र्यांची चौकशी करतील.

चौकशीसाठी राज्यमंत्री जय प्रकाश निषाद यांना नोटीस पाठविण्याची तयारी सुरु आहे. पशुधन घोटाळ्याप्रकरणी एसीपी गोमती नगरकडून चौकशी केली गेली आहे. या दोन्ही घोटाळ्यांचा मुख्य आरोपी आशिष रायचे मंत्र्यांच्या कार्यालयात बऱ्याच प्रमाणात येणे-जाणे होते. या नवीन फसवणूकीची माहिती मंत्री यांनाही असू शकते असा पोलिसांना संशय आहे.

यापूर्वी यूपीच्या पशुसंवर्धन विभागात पीठाचा पुरवठा करण्याच्या नावाखाली फसवणूक होत होती. यामध्ये गुजरातचे उद्योजक नरेंद्र पटेल यांनी एफआयआर दाखल केला होता, त्यात पत्रकार, अधिकाऱ्यांनी पशुधन विभागाला कंत्राट देण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची लूट केली. पशुसंवर्धन विभागाच्या प्रकरणाच्या तपासादरम्यान अन्न व पुरवठा विभागाची बनावट फसवणूक उघडकीस आली होती.