यूपी : PFI च्या 2 सदस्यांना अटक, लखनऊ हादरवण्याचा होता कट; निशाण्यावर होते हिंदू संघटनांचे प्रमुख नेते

लखनऊ : उत्तर प्रदेश पोलीस दलाचे एडीजी (कायदा सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, राज्याच्या एसटीएफने 2 लोकांना अटक केली आहे, ज्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके, शस्त्र आणि काही कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या लोकांचा संबंध पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) नावाच्या दहशतवादी संघटनेशी आहे.

त्यांनी सांगितले की, वसंत पंचमीच्या जवळपास अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणून अनेक वरिष्ठ अधिकारी आणि सामान्य जनतेत दशहत पसरवण्याची त्यांची योजना होती. मागील सुमारे एक वर्षात या संघटनेच्या 123 लोकांना आम्ही अटक केली आहे. एसटीएफने पीएफआयचे दोन सदस्य केरळचे अंसाद बदरुद्दीन आणि फिरोज खान यांना अटक केली आहे. ते आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत होते.

प्रशांत कुमार यांनी सांगितले की, फिरोज आणि बदरुद्दीन यांना गुडंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुकरैल परिसरातून अटक केली आहे. ते प्रमुख हिंदू संघटनांच्या मोठ्या नेत्यांना निशाणा बनवणार होते. त्यांच्याकडून 16 उच्च स्फोटके, एक्सप्लोजिव्ह डिव्हाईस, बॅटरी डेटोनेटर, लाल रंगाची तार, 32 बोरची पिस्टल, 7 काडतूस, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, पेन ड्राइव्ह, 12 रेल्वे तिकिट आणि मेट्रो कार्ड जप्त केली आहेत.

त्यांनी सांगितले की, 11 फेब्रुवारीला काही लोक ट्रेनने येणार असल्याची माहिती मिळाली होती आणि मंगळवारी त्यांना अटक करण्यात आली. हाथरसच्या घटनेनंतर सुद्धा मथुराहून पीएफआयच्या काही सदस्यांना अटक झाली होती. सादुफ जो या प्रकरणात हवा तो त्यालाही अटक करण्यात आली आहे. मात्र, त्यावेळी ही संघटना कोणत्याही प्रकारचा गुन्हा आणि हिंसेबाबत नकार देत होती, परंतु त्यांच्या वेबसाइटवर याबाबत लिहिले आहे. हे छोटे छोटे ग्रुप बनवून काम करण्याची योजना बनवत होते. बुधवारी पीएफआयचा स्थापना दिवस आहे यासाठी पूर्ण अलर्ट ठेवण्यात आला आहे.