उन्नाव रेप केस : पिडीतेला जिवंत जाळून हत्या केल्याप्रकरणी ‘SIT’कडून आरोपींविरूध्द ‘चार्जशीट’ दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये बलात्काराच्या घटनेतील पीडितेला जाळून तिची हत्या करण्यात आलेल्या प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) आरोपपत्र दाखल केले आहे. एसआयटीने मुख्य आरोपी शिवम त्रिवेदी याच्याशिवाय शुभम त्रिवेदी, हरिशंकर त्रिवेदी, रामकिशोर त्रिवेदी, उमेश कुमार यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

एसआयटीच्या पथकाने न्यायिक मॅजिस्ट्रेट कोर्ट, उन्नावमध्ये 360 पानाचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात आरोपींना पीडितेला जाळून, धमकी देणे आणि हत्याचा आरोप लावण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून पीडितेच्या कुटूंबाला 25 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक घर देखील देण्यात आले आहे.

जामीनावर सुटका –
पीडितेबरोबर दुष्कर्मचा आरोप असलेल्या शिवांश आणि शुभम या आरोपींना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतले आहे. पीडितेला जाळण्याच्या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी आरोपीची जामीनावर सुटका झाली होती. 5 डिसेंबरला सकाळी पीडितेला प्रकरणाच्या सुनावणीसाठी रायबरेली जायचे होते परंतु त्या आधीच आरोपींनी पीडितेला गाठून तिला रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची घटना घडली.

उन्नावहून लखनऊ आणि नंतर दिल्ली –
यानंतर पीडितेला पहिल्यांदा उन्नावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु नंतर तब्येत गंभीर असल्याने तिला लखनऊच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परिस्थिती गंभीर असल्याने दिल्लीला एअरलिफ्ट करुन तिच्यावर सफदरजंगच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. परंतु पीडितेला आपला जीव गमावावा लागला.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/