UP च्या कॅबिनेटनं घेतले 7 मोठे निर्णय ! आयोध्यामध्ये प्रभु श्रीरामाची मुर्ती आणि पर्यटनासाठी 446 कोटींना मंजूरी

लखनौ : वृत्त संस्था  – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७ मोठे निर्णय घेण्यात आले. त्यात अयोध्येत भगवान रामाची भव्य मूर्ती उभारण्यात येणार असून त्यासाठी सीएसआर फंड आणि दानाद्वारे आर्थिक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
अयोध्या येथे भगवान राम यांच्याविषयी असलेली आस्था लक्षात घेऊन श्रीराम यांची मूर्ती, फुड प्लाजा व पर्यटन सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी ६१ हेक्टर जमीन खरेदी करण्यासाठी ४४६ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश नगरीय नवीकरण ऊर्जा विकास अधिकरण या मंत्रालयामार्फत सौर ऊर्जा निती २०१७ अंतर्गत ५०० मेगावॅट क्षमता निर्माण करण्यासाठी निविदा मागविण्यात येणार आहे.

राज्यात पर्यटन विकासासाठी खास पर्यटन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे. सारनाथ येथे एक पर्यटन पोलीस ठाणे तर दुसरे लालपूर येथे उभारण्यात येणार असून त्याला मोफत जमीन दिली जाणार आहे.बुंदेलखंड व गोरखपूर लिंक एक्सप्रेस वे च्या विकासकची निवड करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
 जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
 ‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार