नागाच्या दमदार एन्ट्रीमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा !

पोलिसनामा ऑनलाईन – गाडी घेऊन जाताना समोर प्राणी किंवा साप आडवा आल्याच्या घटना घडतात. पण एका नागाने तर चक्क अख्खा महामार्ग रोखून धरला होता. सुमारे तासभर हा साप महामार्गावर फणा काढून ठाण मांडून बसला होता. त्यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेकजण गाडीतून उतरून नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी आले तर रस्त्याच्या मध्यभागी साप पण कुणालाही बराचवेळ त्याला हटवण्याचे धाडस झाले नाही.

लखनौ-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील गजरौला परिसर ही घटना घडली आहे. स्थानिकांनी या घटनेचा व्हिडीओ कॅमेर्‍यात कैद केला आहे. रस्त्याच्या मध्यभागी साप आला तेव्हा सगळ्यांनी गाडी थांबवली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी गाड्यांची लांबच लांब रांगा होत्या. सुमारे तासभर साप रस्त्यावर राहिल्यानंतर निघून गेला. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. अखेर तासाभरापासून जाम झालेले ट्रॅफिक हळूहळू सुरळीत झाले. यादरम्यान नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.