‘मास्क’ लावून आलेल्या गुंडांकडून दिव्यांग महिलेवर सामूहिक बलात्कार

कानपूर : वृत्तसंस्था – कानपूरमध्ये एका दिव्यांग महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तोंडावर मास्क लावलेल्या काही गुंडानी घरात घुसून त्या महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवला आणि खोलीत झोपलेल्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्या महिलेवर बलात्कार करण्यात आला. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत.महिलेकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. बिधनू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहते. ती आपल्या मुलासोबत राहते. तर तिचा पती हमीरपूरमध्ये येथे राहतो. मंगळवारी पहाटे ३ ते ४ वाजता तोंडाला मास्क लावून दोन गुंड घरात घुसले त्यांनी महिलेवर पिस्तूल रोखून मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

नेमकं काय घडलं
त्या रात्री महिला आपल्या खोलीत झोपली होती. तिचा २२ वर्षाचा मुलगासुद्धा बाजूला झोपला होता. तेव्हा काही गुंड छतावरून खाली आले आणि त्यांनी महिलेवर पिस्तुल रोखले. तसेच तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. आणि तिच्यावर बलात्कार केला. महिलेने आरडाओरड केली असता तिचा मुलगा झोपेतून जागा झाला व त्याने गुंडाना पाहून आरडाओरड सुरु केली. त्यामुळे ते गुंड फरार झाले. त्या दोघांनी मास्क लावला होता आणि अंधारही खूप होता त्यामुळे ती महिला त्यांना ओळखु शकली नाही. महिलेनं घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. त्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. आरोपींचा शोध सुरू आहे, असे पोलीस ठाण्याचे प्रभारी पुष्पराज सिंह यांच्याकडून सांगण्यात आले आहे.