विवाहिता बॉयफ्रेंडसोबत ऑस्ट्रेलियाला गेली, Lockdown मध्ये अडकून पडली

पोलिसनामा ऑनलाईन टीम – विवाहित महिला घरी खोटे सांगून बॉयफ्रेंडसोबत ऑस्ट्रेलियाला गेली होती. मात्र, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ही महिला तिथेच अडकली. त्यानंतर तिच्या पतीला पत्नीच्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती मिळाली. मैत्रीणींसोबत फिरायला जात असल्याचे सांगून विवाहिता गेली होती. उत्तर प्रदेशच्या पीलीभीत गावात ही घटना घडली आहे.

संबंधित विवाहित महिला 6 जानेवारीला पतीच्या पासपोर्टवर बनावट कागदपत्रे तयार करून बॉयफ्रेंडसोबत ऑस्ट्रेलियाला गेली. मार्चमध्ये पुन्हा भारतात परतण्याचा त्यांचा प्लॅन होता. मात्र लॉकडाऊनमुळे दोघे तिकडेच अडकले. आता अनलॉकनंतर ही महिला 24 ऑगस्ट रोजी भारतात परतली आहे. त्यानंतर पतीला पत्नीच्या प्रेमसंबंधाबाबत कळाल्यानंतर त्याने पोलिसात तक्रार केली. तक्रारीनंतर पोलीस अधिक्षक जय प्रकाश यादव यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देऊन दोघांविरुद्ध तक्रार नोंदवली. गेल्या 20 वर्षांपासून महिलेचा पती मुंबईत कामानिमित्त राहत होता. पत्नीला भेटण्यासाठी तो गावी पीलीभीतला जात होता. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर या महिलेचा पती गावी परतला. तेव्हा त्याला कळले की पत्नी ऑस्ट्रेलियाला गेली आहे. पत्नीने घरी पतीसोबत फिरायला जात असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी केलेल्या तपासणीत या महिलेने आणि तिच्या बॉयफ्रेंडने महिलेच्या पतीच्या नावाने 2 फ्रेबुवारी 2019 रोजी पासपोर्ट तयार केल्याचे निष्पन्न झाले.