भाजप नेत्याचं ‘भलतंच’ वक्‍तव्य ; म्हणाले, ‘हे पाणी प्या आणि सिझेरियन टाळा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपमधील अनेक वाचाळवीरांनी त्यांच्या वक्तव्याने आणि शोधाने आपले ज्ञान अनेकदा जनतेला दाखवून दिले. आता असाच नवा शोध पुन्हा एका भाजप नेत्यांने लावला आहे. गरुड गंगा नदीचे पाणी प्या आणि सिझेरियन थांबवा असा सल्ला देत नवा शोध लावला आहे. हा भाजपचा खासदार नेता आहे अजय भट.

अजय भट हे उत्तराखंडमधील भाजपचे खासदार आहेत. यांची लोकसभेत बोलताना हा अजब सल्ला दिला आहे. होमीओपॅथी सेंट्रल काउन्सिल या विधेयकाविषयी लोकसभेत बोलत असताना यांनी हा अजब गजब सल्ला दिला आहे.

यावेळी खासदार अजय भट यांनी दावा केला की गरुड गंगा नदीतील पाण्यात वैद्यकीय गुण आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, अनेक लोकांना गरुड गंगा नदीतील पाण्याचे महत्व माहित नाही. एकदा काकडीघाट मधील व्यक्तीने मला घरात साप शिरल्याचे सांगितले होते आणि मला मदत मागितली होती. तो व्यक्ती कुटूंबासह घराबाहेर राहत होता, कारण त्याला सर्प दंशांची भीती वाटत होती. त्या व्यक्तीला मी गरुड नदीतील गोटे घरात ठेवण्यास सांगितले, त्याने तसे केल्यावर त्याचा घरातील साप देखील निघून गेला.

त्यांनी दावा केला की गरुड नदीत मिळणारे गोटे आणि पाणी अतिशय गुणकारी आहे. या नदीतील गोटे एकमेकांवर घासून ते नदीच्या एक कपभर पाण्यात मिसळू गर्भवतीने महिलेने पिल्यास तिला सिझेरियन प्रसूतीपासून सुटका मिळेल. तसेच या नदीतील गोटे सर्पदंश झालेल्या ठिकाणी घासल्यास सर्प दंशाचा परिणाम होऊन विषबाधा होत नाही.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like