‘माँ गंगा’च्या कृपेमुळं नाही पसरणार कोरोना, कुंभची तुलना मरकजशी होऊ शकत नाही – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नही केले जात आहेत. त्यानुसार, गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, हरिद्वार येथे कुंभमेळ्यात झालेल्या गर्दीची एकच चर्चा सुरू आहे. त्यावरून उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह यांनी वक्तव्य केले. ‘माँ गंगाच्या कृपेने कोरोनाचा फैलाव होणार नाही, कुंभची तुलना मरकजशी होऊ शकत नाही’.

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, महाकुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामध्ये अनेकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरे शाही स्नान पार पडले. यामध्ये सहभागी झालेल्या 102 साधू व भाविकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यावरून तीरथ सिंह यांनी म्हटले, की कुंभची तुलना मरकजशी केली जाऊ शकत नाही. मरकजमुळे जो कोरोना पसरला तो बंद खोलीत असल्याने पसरला. कुंभ उघडल्यावर झाला. तिथे कोरोना पसरणार नाही. माँ गंगाची अविरल धारा आहे. माँ गंगाचा आशीर्वाद घेऊन जाल तर कोरोना पसरणार नाही’.

दरम्यान, ‘सोमवती अमावस्यावर दुसऱ्या शाही स्नानला भाविकांचा उत्साह असेल. सकाळी आठ वाजेपर्यंत 15 लाख भाविकांनी स्नान केले आहे. सकाळी 6 वाजता भाविकांचा आकडा 28 लाख पोहोचला आहे.