उत्तराखंड : तपोवन टनलच्या आत ड्रिलिंग मशीनचा वापर, 30 पेक्षा जास्त लोक अडकल्याची शंका

जोशीमठ : उत्तराखंडमध्ये तपोवन टनलच्या आत ड्रिलिंग मशीनचा वापर केला जात आहे. चमोली पोलिसांनुसार, आतापर्यंत एकुण 38 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. गाळाने भरलेल्या या भुयाराच्या आत अडकलेल्या लोकांच्या संभाव्या स्थानापर्यंत पोहचण्यासाठी एक सहायक भुयारात खोदण्यात आलेले एक भुयार बचाव टीमने शनिवारी आणखी रूंद करण्यास सुरूवात केली.

कॅमेरा आणि पाईप पाठवण्याची तयारी
नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन(एनटीपीसी) प्रकल्पाचे महासंचालक आर. पी. अहिरवाल यांनी सांगितले की, आम्ही भुयारात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहचण्यासाठी तीन रणनितीवर काम करत आहोत. काल केलेल्या भुयाराला एक फुट रूंद केले जात आहे, जेणेकरून गाळाने भरलेल्या भुयाराच्या आत त्या स्थानापर्यंत कॅमेरा आणि एक पाईप पोहचावा, जिथे लोक अडकल्याची शंका आहे. त्यांनी म्हटले की, एक फुट परिघाचे भुयार कॅमेरा आणि पाईप पाठवणे आणि अडकलेल्या लोकांना लोकांच्या ठिकाणाचा शोध घेण्यास मदत करेल.

भुयाराच्या आत साठलेले पाणी या पाईपने बाहेर काढले जाईल. त्यांनी म्हटले की, दोन रणनिती अंतर्गत एनटीपीसी बॅराजच्या गाळाच्या बेसिनला स्वच्छ केले जात आहे. ज्याचा गाळ सतत भुयारात जात आहे. सोबतच धौलीगंगाच्या प्रवाहाला पुन्हा उजव्या बाजूला वळवले जाईल, जो अचानक आलेल्या पुरामुळे डावीकडे वळला होता आणि ज्यामुळे गाळ काढण्याच्या कामात अडथळा येत आहे.

100 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ लागले कामाला
अहिरवाल यांनी सांगितले की, एनटीपीसीने आपल्या 100 पेक्षा जास्त शास्त्रज्ञांना या कामाला लावले आहे. बचाव पथकाला आत जाण्यासाठी भुयार आणखी रूंद करावे लागेल आवश्यकता भासल्यास असे केले जाईल.