Uttarakhand Election 2022 | दिवंगत जनरल बिपीन रावत यांचे भाऊ निवृत्त कर्नल विजय रावत यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे पहिले सैन्यदल प्रमुख (Chief of Defence staff) CDS जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter crash) निधन झाले. त्यांचे धाकटे बंधू विजय रावत (Retired Colonel Vijay Rawat) यांनी आता राजकारणात (politics) प्रवेश करत भाजपमध्ये (BJP) सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडच्या निवडणुकीपूर्वी (Uttarakhand Election 2022) विजय रावत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्याप्रमाणे दिल्लीत बुधवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन भाजपचा झेंडा हाती घेतला. वडीलबंधू प्रमाणेच विजय रावत हे देखील भारतीय लष्करात अधिकारी होते. कर्नलपदावरुन ते निवृत्त झाले आहेत. पुढील महिन्यात उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका (Uttarakhand Election 2022) होणार असून विजय रावत यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची प्रशंसा करत त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार मानले. विजय रावत यांनी भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीत पक्षप्रवेश केला. रावत यांचा परिवार भाजप जवळचा होता, असं दिसतं. विजय रावत यांच्या सांगण्यानुसार त्यांचे वडीलही भाजपसाठी काम करत असत. आता मला पक्षासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे, असं रावत यांनी म्हटले. रावत यांच्या पक्ष प्रवेशावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (CM Pushkar Singh Dhami) उपस्थित होते.

उत्तराखंड निवडणुकीच्या (Uttarakhand Election 2022) पार्श्वभूमीवर रावत यांना पक्षात सामील करुन घेतल्याने भाजपला फायदा होऊ शकतो. उत्तराखंडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहे. रावत यांचे वडील लष्करात होते. मोठे भाऊ जनरल बिपीन रावत लष्कर प्रमुख आणि नंतर पहिले CDS झाले.

 

Web Title :- Uttarakhand Election 2022 | cds bipin rawat younger brother colonel vijay rawat joined bjp uttarakhand election 2022 update

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा