Breaking : उत्तराखंडावर मोठी आपत्ती ! हिमकडा बंधार्‍यावर कोसळला, धौलीगंगा नदीला आला पूर (व्हिडीओ)

वृत्तसंस्था : चमोली : चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरातील रैनी गावात वीज प्रकल्पात हिमकडा (ग्लेशियर) कोसळल्याची घटना घडली आहे. त्यातून धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली आहे. त्यातून काही गावातील लोक वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

चमोली जिल्ह्यातील ऋषि गंगा नदीवरील धरणाच्या भिंतीवर हिमकडा कोसळला. त्यामुळे धरणाची भिंत फुटली आहे. धौली गंगा नदीला त्यामुळे मोठा पूर आला आहे. त्यामुळे त्याच्या पुढील भागात नदीवरील राफ्टिंग थांबविण्यात आला आहे. या नदीच्या पाण्याचा लोंढा अगदी हरिद्वार, ऋषिकेश पर्यंत येण्याची शक्यता असून तेथे मोठा पूर येऊ शकतो, त्यामुळे हरिद्वार, ऋषिकेशमध्ये अर्लट जारी करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

चमोली येथील धारीदेवी मंदिर खाली करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे संपूर्ण उत्तराखंड परिसरात अर्लट जारी करण्यात आला आहे.