उत्तरकाशीत मदत सामग्री घेऊन जाणारे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, तिघांचा मृत्यू

उत्तरकाशी : वृत्तसंस्था – उत्तराखंडमधील उत्तरकाशीत पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी गेलेले हेलिकॉप्टर कोसळले असून या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. कॅप्टन, सहपायलट आणि स्थानिक व्यक्ती यांचा मृतांमध्ये समावेश आहे. मदतीची सामग्री घेऊन जात असताना एका वीजेच्या तारेत अडकून हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. याबाबतची माहिती उपविभागीय दंडाधिकारी देवेंद्र नेगी यांनी दिली आहे.

उत्तराखंडमध्ये भूस्खलन आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. येथे बचावकार्य सुरू आहे. उत्तराखंडातील उत्तरकाशी परिसरातील मोरी तालुक्यात मदत कार्य सुरू होते. यासाठी तीन हेलिकॉप्टर कार्यरत होते. हेलिकॉप्टरद्वारे पिण्याचे पाणी आणि खाण्याची पाकिटं पाठवण्याचे काम सुरू होते. आज सकाळी या हेलिकॉप्टरने देहराडूनहून उत्तरकाशीमधील मोरी येथे मदत घेऊन जाण्यासाठी उड्डाण केले. हे हेलिकॉप्टर मोरीहून मोलदीला जात असताना प्रवासात ते एका वीजेच्या तारेला धडकले आणि त्यानंतर ते तारेत अडकले. या नंतर ते खाली कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या तिघांचाही मृत्यू झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like