बॉयफ्रेंडच्या ‘त्या’ वागण्यामुळे ‘ही’ अभिनेत्री म्हणते, ‘प्रेम आणि लग्न…. नको रे बाबा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही शो डायनमध्ये दिसणारी प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ता सध्या आजारी आहे. ती अनेकदा तिच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. टीनाने काही दिवसांपूर्वीच आपल्या नात्यावर खुलून भाष्य केलं होतं. त्यावेळी टीनाने सांगितले होते की, ती आता सिंगल आहे शिवाय ती आता कोणासोबतही रिलेशनशिप ठेवू इच्छित नाही. टीना एका मुलाखतीत म्हणाली की, “ना लग्न, ना प्रेम आता फक्त काम करायचे आहे. सगळ्यांना आपल्या लाईफमध्ये सेट व्हायचं असतं. परंतु या गोष्टींचा कोणी प्लॅन नाही करू शकत. प्रेम आणि लग्न तेव्हाच होतं जेव्हा त्याची वेळ येते.”

पुढे टीना म्हणाली की, “सिनेमात जी लव्ह स्टोरी दाखवली जाते, तसं खऱ्या आयुष्यात होत नाही. प्रेम ही एक फिलींग आहे जी समजायला थोडी अवघड असते. असं नाहीये की, जगात प्रेम नाहीये. जिथे अपेक्षा असते तिथे हे मिळत नाही.” याच मुलाखतीत टीनाला विचारण्यात आलं की, “तिला कसा जीवनसाथी हवा आहे? यावर उत्तर देताना टीना म्हणाली की, “तो प्रेम करणारा आणि केअरींग असायला हवा. ज्याला माझ्या भावनांची कदर असेल असा असावा. लाईफमध्ये तो सेटल असायला हवा.” टीना म्हणाली की, “आयुष्यातील प्रत्येक क्षण जगायला हवा. आयुष्य हे आईस्क्रिमसारखं आहे. ज्याला वितळण्याआधी खायला हवं. आपल्या जवळच्या आणि खास लोकांनी किंमत करायाला हवी. आयुष्यात नाते महत्त्वाचे असतात. फॅमिली ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ देते. त्यांची जागा कोणीच नाही घेऊ शकत.”

नात्याबद्दल आणखी बोलताना टीना म्हणाली की, “प्रिंस चार्मिंगसारखं काहीच नसतं. लोक जे दाखवतात ते तसे नसतात. आमचं प्रोफेशनदेखील असं आहे की, आम्हाला आमच्या नात्यांवर फोकस करावा लागतो. दिवसभर थकून आल्यानंतर एक रिकामं घर पाहण्यापेक्षा तुम्हाला एखाद्या स्पेशल वनला पाहायचं असतं. माझे पॅरेंट्स कोलकात्यात राहतात. मलाही त्यांच्यासोबच रहायचं आहे. परंतु कामामुळे ते शक्य होत नाही.”

image.png