बायकोला संपवल्यानंतर मेहुण्याला अन् पोलिस कंट्रोल रूमला कळवलं, म्हणाला….

बस्ती : पोलीसनामा ऑनलाईन –   घरगुती कारणावरून पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून हत्येची कबुली दिली. तसेच मला पकडण्यासाठी या असे आरोपीने पोलिसांना सांगितले. घटनेची माहिती मिळताच कप्तानगंज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. तसेच आरोपीने आपल्या मेहुण्याला खून केल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर दिली. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

पुष्पा गुरुप्रसाद मिश्रा असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर गुरुप्रसाद मिश्रा असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा आणि गुरुप्रसाद यांचे 4 वर्षापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर पुष्पाचा पती अमरेश तिचा हुंड्यासाठी छळ करून तिला मारहाण करत असत. त्यामुळे वेळोवेळी माहेरचे लोक येऊन त्यांच्यातील वाद मिटवायचे. पुष्पा 3 दिवसांपूर्वीच माहेरहून पतीसोबत सासरी आली होती. पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर पुन्हा माहेरची मंडळी आली आणि त्यांच्यातील वाद मिटवून परत गेली होती. गुरुवारी पुष्पाला माहेरी जायचे होते. त्यामुळे दोघात आदल्या रात्री वाद झाला. त्यानंतर पतीने पुष्पाची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने याबाबतची माहिती आपल्या मेहुण्याला दिली. त्यानंतर पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर कप्तानगंज पोलीस घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पुढील तपास पोलीस करत आहेत.