CM तीरथ सिंह रावत यांना अमिताभच्या नातीने दिले चोख प्रत्युत्तर, म्हणाली – ‘कपडे बदलण्यापूर्वी तुमची मानसिकता बदला’

पोलीसनामा ऑनलाईन : उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांनी सत्ता स्वीकारताच पहिले वादग्रस्त विधान केले आहे. मंगळवारी बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या कपड्यांविषयी असे कााही विधान केले, ज्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यांच्या नजरेत स्त्रियांनी फाटलेली जीन्स घालणे संस्कार नाही.

मुख्यमंत्र्यांनी निवेदनात म्हटले आहे की – आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे सर्व ठीक आहे का? हे कसे संस्कार आहेत? मुलांमध्ये कसे संस्कार येतात हे पालकांवर अवलंबून असते. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी असेही निवेदन दिले की, काही महिलांवर पाश्चिमात्य विचारांचा जास्त परिणाम झाला आहे. आता याच वादग्रस्त वक्तव्यावर मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. आपली मानसिकता बदलण्याविषयी तिने मुख्यमंत्र्यांना म्हंटले.

इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना नव्याने लिहिले, ‘ ‘आमचे कपडे बदलण्यापूर्वी तुमची मानसिकता बदला. हैराण करणारी गोष्ट म्हणजे समाजात संदेश कसा दिला जात आहे. नव्याचा राग इतका वाढला की, तिने पोस्टनंतर फाटलेल्या जीन्समध्ये तिचा एक फोटोही शेअर केला होता. तो फोटो शेअर करताना नव्याने लिहिले की – मी माझी फाटलेली जीन्स घालेन, मी मोठ्या अभिमानाने घालेन … धन्यवाद.’ अमिताभच्या नातीची ही शैली सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

नव्याला मिळाला पाठिंबा

सीएम रावत यांच्या वादग्रस्त निवेदनामुळे नव्यालाही बर्‍याच लोकांचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. सर्वजण या विधानावर जोरदार टीका करीत आहेत आणि महिलांविषयीच्या या विचारांना लज्जास्पद म्हणून संबोधत आहेत. दरम्यान, यापूर्वीही अमिताभच्या नातीने अनेक विषयांवर आपले मत दिले आहे. ती केवळ सोशल मीडियावर आपली छायाचित्रे शेअर करण्यासाठीच सक्रिय नसते, तर काही वेळा ती या व्यासपीठावर आपले मत मांडतानाही दिसली.