पाकिस्तानच्या दुटप्पीपणावरून उईगुर कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी इम्रान खानला फटकारलं

जिनिव्हा : वृत्तसंस्था – भारत सरकारने जम्मू-काश्मीर मधून ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा अक्षरशः तिळपापड झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान काश्मीर मुद्यावरून भारतावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. इम्रान खान प्रत्येक ठिकाणी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत आहेत. परंतु , त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. जिनिव्हा येथे जागतिक उईगर काँग्रेसचे अध्यक्ष डॉल्कन ईसा यांनी पाकिस्तान च्या पंतप्रधांना चांगलेच फटकारले.

पाकिस्तानचा दुटप्पीपणा लाजिरवाणा
डॉल्कन ईसा, जे जागतिक उईगुर कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी पाकिस्तानच्या दुटप्पीपणावरून पाकिस्तानच्या पंतप्रधांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणाले की, पाकिस्तानचे प्रधानमंत्री सारखं सारखं काश्मीरचा मुद्दा मांडत आहेत .परंतु , उईगुर कॉंग्रेसच्या ठिकाणी डोळे झाकून घेत आहेत. तसेच इम्रान खान चीनच्या धोरणांना पाठिंबा दर्शवत आहे. हा एकदम दुटप्पीपणा असून ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा शब्दात फटकारले.

ईसा यांनी पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांना अतिशय खडे बोल सुनावले आहेत. यानंतर तरी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे डोळे उघडले जातील याबाबत साशंकता आहे. एकंदरीत पाकिस्तानचा पूर्व इतिहास पाहता त्यांच्यात काही फरक पडेल असे वाटत नाही.

Loading...
You might also like