V K Singh On Russian Ukraine War | ‘तुम्ही मंगळावर जरी अडकला असाल तरी भारतीय दुतावास तुमची मदत करेल, ही भारताची रणनीती’ – व्ही के सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – V K Singh On Russian Ukraine War | रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russian Ukraine War) शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले अनेक विद्यार्थी तेथे अडकून पडले आहे. भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ऑपरेशन गंगाची जलदगतीने सुरुवात करण्यात आली आहे. तसेच युक्रेनच्या शेजारील राष्ट्रांमध्ये सरकारमधील चार मंत्री जाणार आहेत. त्यामुळे या चार मंत्र्यांच्या माध्यमातून ऑपरेशन गंगामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न होणार आहे. (V K Singh On Russian Ukraine War)

 

दरम्यान, या सर्व घडामोडीत भाजपचे केंद्रीय मंत्री व्ही के सिंह (V K Singh) यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सिंह हे पोलंडला रवाना होणार आहेत. तत्पूर्वी यासंदर्भात बोलताना व्ही के सिंह म्हणाले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं पाऊल उचलले आहे. तेथील एकही भारतीय नागरिक मागे राहणार नाही. युद्धक्षेत्रात बंधने आहेत, संभ्रम आहेत, सीमांवरही काही अडचणी आहेत. त्यामुळे अडकलेल्या भारतीयांनी संयम आणि सूचनांचे पालन करावे अन्यथा परिस्थिती बिकट होऊ शकते, असे ते म्हणाले.

 

पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेचे सिंह यांनी कौतुकही यावेळी केले ते म्हणाले, तुम्ही मंगळावर जरी अडकला असाल तरी भारतीय दुतावास तुमची मदत करेल.
ही भारताची रणनीती आहे. पंतप्रधान मोदी दूरदृष्टीने विचार करत असल्याने ते चार मंत्र्यांना पाठवत आहेत.
सरकारकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अडकलेल्या भारतीयांनी केवळ संयम ठेवून सुरक्षित राहावं असं म्हटलं आहे.

 

युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी जाणार

ऑपरेशन गंगा जलदगतीने राबवण्यास सुरुवात झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार चार मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील राष्ट्रांमध्ये पाठवण्यात येणार असून ते समन्वयाचे काम करणार आहेत.
जे मंत्री रवाना होणार आहेत त्यामध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू आणि जनरल व्ही. के. सिंह यांचा समावेश आहे.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपात्कालीन बैठक बोलावली होती.
त्या बैठकीत मोदींनी विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढणं हे आपलं प्राधान्य असल्याचं स्पष्ट केले होते.
यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला उपस्थित होते.

 

Web Title :- V K Singh On Russian Ukraine War | russian ukraine war even if you restuck on mars indian embassy will help you v k singh on ukraine crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


LPG Gas Price Hike | एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, 7 मार्चनंतर घरगुती गॅससाठी जादा पैसे मोजावे लागणार?

 

Gallbladder Stone | गॉलब्लॅडर स्टोनकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपचाराने करू शकता ठिक; जाणून घ्या

 

Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, खून प्रकरणी संजय काटकरला फाशीची शिक्षा; पुणे कोर्टाने सुनावली शिक्षा