V. Muraleedharan | केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी घेतला केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – V. Muraleedharan | केंद्र शासनाच्या (Central Government) निधीतून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री (Union Minister of State for External Affairs) तथा पुणे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे (दिशा) अध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांनी घेतला. (V. Muraleedharan)

 

दिशा समितीची बैठक (Disha Committee Meeting, Pune) विधानभवन येथे पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे (Pune ZP Nirmala Pansare), पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ढोरे (PCMC Mayor Usha Dhore), खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne), ऑनलाइनरित्या खासदार प्रकाश जावडेकर (MP Prakash Javadekar), गिरीष बापट (Girish Bapat), सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (IAS Ayush Prasad), पिंपरी चिंचवड म.न.पा. आयुक्त राजेश पाटील (PCMC Commissioner Rajesh Patil), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू तसेच विविध कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. (V. Muraleedharan)

 

यंत्रणांनी योजनांच्या अंमलबजावणी तसेच कामे सुचविण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग घेतला जाईल याची दक्षता घ्यावी असे सांगून श्री. मुरलीधरन म्हणाले, भारत सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासह योजनांची पुढील वाटचाल ठरवणे आणि त्यांना गती देण्यासाठी या आढावा बैठकीस महत्व आहे. कोरोना परिस्थितीमुळे (Corona Crisis) यापूर्वी विलंब झाला असला तरी यापुढे दर तीन महिन्यांनी ही बैठक घेण्यात येईल. बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवरील कार्यपूर्ती अहवाल पुढील बैठकीत उपलब्ध करुन देण्यात यावा जेणेकरून झालेल्या प्रगतीची माहिती मिळू शकेल.

केंद्रपुरस्कृत ५४ योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये पुणे मेट्रो (Pune Metro), भारतमाला (Bharatmala), प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजना (Pradhan Mantri Anna Suraksha Yojana), गरीब कल्याण अन्न योजना (Garib Kalyan Anna Yojana), अमृत योजना (Amrit Yojana), नदी सुधार प्रकल्प (River Improvement Project), प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana), स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Mission), श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रामीण अभियान (Shyama Prasad Mukherji Grameen Abhiyan), भारत नेट (Bharat Net), जलजीवन मिशन (Jaljivan Mission), राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान (Rashtriya Gram Swaraj Abhiyan), एकात्मिक ऊर्जा विकास योजना (Integrated Power Development Scheme),

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme), बेटी बढाओ बेटी पढाओ (Beti Bachao Beti Padhao), दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना (Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana), मुद्रा योजना (Mudra Yojana), प्रधानमंत्री जनधन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana), प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhan Mantri Pik Vima Yojana), कृषी सिंचन योजना (Krishi Sinchai Yojana), सर्व शिक्षण अभियान (Sarva Shiksha Abhiyan), राष्ट्रीय हरित भारत अभियान (Rashtriya Harit Bharat Abhiyan) आदी योजनांचा समावेश आहे.

 

स्मार्ट सिटी योजनेच्या (Smart City Plan) आढावा घेताना स्मार्ट सिटीच्या कामांच्या अंमलबजावणीमध्ये लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेतल्या जाव्यात.
त्यातून चांगली कामे सुचवली जातात.
त्यामुळे बोर्ड बैठकीला महत्व देतानाच सल्लागार समितीची बैठकही नियमितपणे घेण्यात यावी, असे निर्देश मुरलीधरन यांनी दिले.

भारतमाला योजनेंतर्गत रस्त्यांच्या सर्व प्रकल्पांसाठी भूमीसंपादन झाले असून त्यासाठी १ हजार २०० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत,
अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधकाम साहित्याच्या
महागाई वाढीमुळे ग्रामीण भागात अनुदानाच्या रकमेत वाढ करावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.

 

बैठकीस दिशा समितीचे सदस्य जिल्ह्यातील नगरपरिषदांचे नगराध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती आदी उपस्थित होते.

 

Web Title :- V. Muraleedharan | Union Minister of State for External Affairs V. Muralitharan reviews centrally sponsored schemes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार?, जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

 

Corona New Guidelines | राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, मुंबई – पुण्यासह ‘या’ 14 जिल्ह्यांना मोठा दिलासा

 

Healthy Heart | हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी करा; जाणून घ्या