पहिल्यांदाच ‘या’ अ‍ॅक्ट्रेससोबत काम करणार ‘खिलाडी’ अक्षय, ‘बेलबॉटम’ सिनेमात दिसणार ‘ही’ जोडी !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    बॉलिवूड स्टार वाणी कपूर लवकच स्पाय थ्रिलर बेलबॉटम सिनेमात काम करताना दिसणार आहे. खास बात अशी की, सिनेमात ती सुपरस्टार अक्षय कुमारसोबत झळकणार आहे. अक्षयसोबतचा वाणीचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे.

वाणी म्हणते, मी अक्षय सरांसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी तयार आहे. पूर्ण टीमसोबत काम करण्यासाठी मी उत्साहित आहे. हाच उत्साह स्क्रीनवरही दिसणार आहे.

1980 च्या दशकातील कहाणी

सत्य घटनांपासून प्रेरीत बेलबॉटम हा सिनेमा 1980 च्या दशकातील कहाणीवर आधारीत सिनेमा आहे. भारताकडून विसर पडलेल्या काही नायकांना यात दाखवण्यात आलं आहे. रंजीत एम तिवारी डायरेक्टेड हा सिनेमा वर्षाअखेरपर्यंत रिलीजसाठी तयार असेल. असेम अरोरा आणि परवेज शेखनं हा सिनेमा लिहला आहे. वाणीला प्रोजेक्टमध्ये घेऊन आम्ही उत्साहित आहोत असंही रंजीत यांनी सांगितलं आहे.

का केली वाणीची निवड ?

कास्टींगबद्दल बोलताना प्रोड्युसर जॅकी भगनानी म्हणाला, “पटकथेत एक नवीन जोडी बनवण्यासाठी तिला निवडलं आहे. वाणी टॅलेंटेड अॅक्ट्रेस आहे.” बेलबॉटम हा सिनेमा 2 एप्रिल 2021 रोजी रिलीज होणार आहे.