चाहत्याने केला पाठलाग : घाबरलेल्या अभिनेत्रीची पोलिसठाण्यात धाव

वृत्तसंस्था : अभिनेत्री वाणी कपूरला नुकताच एक अतिशय विचित्र अनुभव आला. अहवालानुसार, वाणी कपूरचा चाहता तिचा मागे गाडी घेऊन पाठलाग करत होता, जोपर्यंत ती पोलिसस्टेशनला पोहचत नाही तोपर्यंत तिचा पाठलाग केला. त्यानंतर ती तिच्या घरी सुरक्षितरित्या पोहचली. बघितल तर वाणी कपूर तिच्या कार मध्ये होती आणि तिचा चाहता बाईक वर तिचा पाठलाग करत होता. तो पाठलाग करत असतांना तिला कळाले तेंव्हा तिच्या गाडी ड्राइव्हरने गाडीचा स्पीड वाढवला आणि त्याला मागे टाकण्याचा प्रयत्न केला. तरी सुध्दा तो तिचा पाठलाग करत होता आणि त्याला कुठल्याही परिस्थिती तिला भेटायचे होते आणि तिच्यासोबत बोलायचे होते.

ती जेंव्हा वर्सोवा कडे जायला निघाली तो तिकडे वळाला पण तिचा ती गोष्ट लक्षात आणि ती घाबरली व तिने ड्रायव्हरला सांगितले आणि वर्सोवा पोलिसस्टेशन गाठले. व तिने तिच्या चाहत्या वर पोलिसस्टेशन मध्ये तक्रार केली. त्याचे नाव समीर खान असे आहे. यावरून असे वाटे की पोलिसांनी चाहत्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली आहे की नाही ही माहिती उघड झाली नाही.