‘एकाचं नाव घेणं दुसऱ्यावर अन्याय ठरेल’ : अभिनेत्री वाणी कपूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री वाणी कपूर लवकरच आपला आगामी सिनेमा वॉरमध्ये दिसणार आहे. एका मुलाखतीत वाणीला विचारण्यात आले की, ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ पैकी तुला कोणाचा डान्स आवडतो. यावर उत्तर देताना वाणी म्हणाली की, “दोघांपैकी एकाचे नाव घेणे दुसऱ्यावर अन्याय असेल.” याशिवाय इतरही अनेक प्रश्नांची तिने मनमोकळी उत्तरे दिली.

वाणी कूपर म्हणाली, “टायगर आणि ऋतिक दोघेही उत्तम डान्सर आहेत. दोघांची शैली, पर्सनॅलिटी आणि स्टाईल वेगळी आहे. मी ऋतिकसोबत काम केलं आहे. तो अप्रतिम डान्सर आहे. टायगरचे सिनेमे मी पाहिले आहेत. ज्यात त्याने उत्कृष्ट नृत्य केलं आहे. त्यामुळे एाकचे नाव घेणे दुसऱ्यावर अन्याय असेल. असं वाटतं दोघंही आपापल्या शैलीत मास्टर आहेत.”

वॉरमधील आपल्या भूमिकेविषयी बोलताना वाणी म्हणाली, “सिनेमाच्या शुटींगमध्ये खूप मजा आली. सिनेमातील एका गाण्यात मी साया व्हिल केलं आहे. स्विमिंग पॉल केलंय आणि ते माझ्यासाठी अ‍ॅक्शन करण्यापेक्षा कमी नव्हतं. यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली. मी भूमिकेबाबत जास्त काही सांगू शकत नाही.”

वाणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शुद्ध देसी रोमांस या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी वाणी लवकरच वॉरमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती समशेरा या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच दिगदर्शक करण मल्होत्रा आणि रणबीर कपूरसोबत काम करताना दिसणार आहे.

 

Visit : Policenama.com