Vaastu Tips : घरातील मनी प्लँटवर आज आवश्य करा ‘हा’ उपाय; दूर होईल आर्थिक तंगी, नशीब उघडेल

नवी दिल्ली : आज शुक्रवार आहे आणि शुक्रवार लक्ष्मी मातेचा दिवस मानला जातो. ज्योतिषतज्ज्ञांनुसार, शुक्रवारी उपाय करून लोक आपल्या आर्थिक समस्या दूर करण्यासह आर्थिक स्थिती मजबूत करू शकतात. घरात मनी प्लँट असेल तर पैशाची समस्या रहात नाही, परंतु अनेकदा उलटे सुद्धा दिसून येते. मनी प्लँट असूनही असे का होते हे जाणून घेतले पाहिजे.

मनी प्लँट नेहमी योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे आणि स्वच्छ ठिकाणी ठेवा. शुक्रवारी मनी प्लँटवर लाल रंगाचा धागा किंवा रिबन बांधणे शुभ मानले जाते. लाल रंग हा प्रेम, स्नेह, प्रगती आणि यशाचे प्रतिक मानला जातो. यामुळे लाल रंगाची रिबन प्लँटला बांधल्याने घरात साकात्मकता येते आणि लक्ष्मी माता प्रवेश करते.

असा बांधा लाल धागा किंवा रिबन
– शुक्रवारी सकाळी लवकर उठा आणि स्नान करून लक्ष्मी मातेची पूजा करा.
– त्यांच्या समोर दीवा लावा.
– लाल रंगाचा धागा किंवा रिबन लक्ष्मी मातेच्या चरणावर ठेवा.
– नंतर लक्ष्मी मातेची आरती करून हा लाल धागा किंवा रिबनवर हळद-कुंकू अर्पण लावा.
– लक्ष्मी मातेचे स्मरण करून मनी प्लँटच्या मुळाजवळ चारही बाजूने धागा बांधा.
– जर बाटलीत मनी प्लँट असेल तर बाटलीत खालच्या बाजूला लाल धागा बांधा.

हा धागा बांधल्याने काही दिवसानंतर परिणाम दिसून येईल. घरात लक्ष्मी मातेचा प्रवेश होईल, पैसा येण्यास सुरूवात होईल.