म्हणून NET, PHD झालेल्यांना ६ महिन्यात ‘नक्‍की’ नोकरी मिळणार !

पुणे: पोलिसनामा ऑनलाईन – UGC विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व केंद्रीय विद्यापीठातील रिक्त जागा भरण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे येत्या ६ महिन्यात सर्व केंद्रीय विद्यापीठातील रिक्त जागा भरण्यात येणार असून NET आणि  PHD पास झालेल्यांना येत्या ६ महिन्यात नोकरी मिळणार आहे.

या पार्श्वभूमीवर युजीसीने सर्व केंद्रीय विद्यापिठांना या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी वेळ दिला आहे. या आदेशानुसार विद्यापीठांनीही हि पदे भरण्याचे वेळापत्रक तयार केले आहे. आणि त्यावर कामही सुरु केले आहे. कारण त्यांना या सहा महिन्यात या जागा पूर्ण भरायच्या आहेत. यात सामान्य आणि आरक्षित पदे याबद्दल नियमही सांगितले गेले आहेत. चांगले शिक्षण मिळत नसल्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता ढासळत चालली आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. जेणेकरून लवकरात लवकर शिक्षणाचा दर्जा सुधारता येईल.

एका अभ्यासानुसार देशातील सर्व कॉलेज आणि विद्यापीठात ५ लाख पद खाली आहेत. यातील फक्त ४८ विद्यापीठातच ५ हजार पद खाली आहेत. यूजीसी देशातील ९०० विद्यापीठ आणि जवळपास ४०,००० हजार कॉलेजचे काम पहाते.

रिक्त पद भरण्याबाबतची सर्व महिती १५ दिवसात NHERC या पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश यूजीसीने दिले आहेत. तसेच १५ दिवसात या सर्व पदांच्या जाहिराती निघायला हव्यात असेही यूजीसीने सुचवले आहे. ४ महिन्यात अर्जाची पडताळणी करून उमेदवारांची शॉर्टलिस्ट करून त्यांना पाठवलेले मुलखात पत्र संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात यावे.