Vacant Posts in Army | सैन्य दलात 1 लाख 21 हजार जागा रिक्त; संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Vacant Posts in Army |राज्यसभेत खासदार नीरज डांगी (MP Neeraj Dangi) यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट (Ajay Bhatt) यांनी सैन्यदलात दलात एक लाख 21 हजाराहून अधिक पदे (Vacant Posts in Army) रिक्त असल्याचे उत्तर आहे. भूदलामध्ये सर्वाधिक जागा रिक्त असून (Vacant Posts in Army) यामध्ये 90 हजार 640 सैनिकांच्या तर सात हजार 912 अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत.

तरूणांना आकर्षीत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न

दोन हजाराहून अधिक पदे सशस्त्र सेनेच्या वैद्यकीय विभागामध्ये (Medical Department) रिक्त आहेत. लष्करामध्ये पदोन्नतीच्या शक्यतांमध्ये सुधारणा, रिक्त जागा भरणे, तसेच लष्करातील नोकरीकडे तरूणांना आकर्षीत करण्यासाठी सरकारने विविध पावले उचलली आहेत, अशी माहिती डांगी यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

एनसीसी शिबिरांचे आयोजन

शाळा (school), महाविद्यालयांमध्ये (college) सातत्याने मार्गदर्शन आणि व्याख्याने तसेच एनसीसी शिबिरांचे (NCC camp) आयोजन करून तरुण-तरुणींना लष्करात सामील करून घेण्याकरिता प्रयत्न सुरु आहेत. लष्करातील मनुष्यबळाच्या कमतरतेची समस्या दूर करण्यासाठी सरकारद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत, मात्र तरीही जागा रिक्त आहेत. लष्करातील विविध प्रवेश प्रक्रियांचे अर्ज लाखोंच्या संख्येने उमेदवार भरतात, लेखी परीक्षा देतात पण काही उमेदवारांचीच निवड होते. त्यामुळे बहुतांश तरुण लष्करा ऐवजी खासगी क्षेत्राला प्राधान्य देत असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले.

लष्करातील रिक्त पदांची संख्या

दल अधिकारी मिलटरी नर्सिंग ऑफिसर जेसीओ/ओआर/एअरमेन/नाविक
सैन्यदल (Army) 79120 90640
हवाईदल (Air Force) 6100 7104
नौदल (Navy) 11900 11927
वैद्यकीय विभाग 44469 31206

मागील तीन वर्षांत राज्यातील सैनिकांच्या संख्या (अधिकाऱ्यांना वगळता)

वर्ष नौदल हवाई दल सैन्यदल
2018 395 101 4356
2019 520 178 4238
2020 264 187 3941

Web Title : Vacant Posts in Army | one lakh twenty three thousand posts vacant in the army

Parambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ;
ठाण्यात तिसरा FIR दाखल, जाणून घ्या प्रकरण?

Sugarcane Juice | ऊसाचा रस लीव्हरसाठी खुपच ‘हेल्दी’,
वायरल इन्फेक्शनपासून होईल बचाव, इम्यूनिटी वाढते

Coronavirus | राज्यातील ST महामंडळाच्या बसेसला करणार अँटी मायक्रोबियल कोटिंग,
व्हायरस पसरण्यापासून रोखणार

Coronavirus | कोरोना संक्रमित झाल्यानंतर तरूणाला समजले 18 जुन्या आजारांचे रहस्य,
लहानपणी केली होती ही चूक