लस घेतलेल्या नागरिकांना ‘या’ बँका देतायत FD वर अधिक व्याजदर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाला Corona रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिम जोरात सुरु आहे. कोरोना लसीकरणामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं म्हणून केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. भारतात सध्या कोविशील्ड, कोवॅक्सिन अन् स्पुतनिक वी लसीचे डोस दिले जात आहेत. लसीकरणाला चालना देण्यासाठी विविध संस्था पुढे आल्या आहेत. आता बर्‍याच बँकासुद्धा या मोहिमेत सामील झाल्या आहेत. ज्या लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यांना (FD)  एफडीवर (FD) अधिक व्याज देण्यात येणार असल्याचे बँकानी जाहीर केले असून ही ऑफर केवळ मर्यादित काळासाठी आहे.

 

 

ज्या व्यक्तींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

999 दिवसांसाठी FD केली तर त्यांना अतिरिक्त 30 बेसिस पॉईंट्स दिले जाणार असल्याचे UCO बँकेने म्हटले आहे.

ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत लागू आहे.

सेंट्रल बँकेने देखील ‘इम्यून इंडिया डिपॉझिट स्कीम लाँच केली होती.

या अंतर्गत 1111 दिवसांसाठी एफडीवर 25 टक्के अतिरिक्त बेसिस पॉईंटस देत आहे.

याद्वारे ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त लाभ देण्यात येत आहे.

लसीकरणाला चालना देण्यासाठी बँकेने इम्यून इंडिया डिपॉझिट स्कीम लाँच केल्याचे बँकेने ट्विटरद्वारे सांगितले आहे.

दरम्यान कालच आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 23.59 कोटी नागरिकांना लस दिली आहे.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना 21 जून पासून देशात 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे.

Also Read This : 

पर्यावरण दिनानिमित्त लावली चक्क गांजाची झाडं; फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुरु केला तपास

 

त्वचा-आरोग्य आणि प्रतिकारशक्तीसाठी रामबाण उपाय आहे टोमॅटोचा रस; ‘या’ पध्दतीनं बनवा, मिळतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या

 

Pune News | महापालिकेचा मोर्चा ‘पाणीपट्टी’ थकबाकी वसुलीकडे; ऑक्टोबर अखेरपर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन – रुबल अग्रवाल

 

Dahi-Kishmis Benefits : तंदुरूस्त रहायचे असल्यास दह्यामध्ये मनुक्यासोबत मिक्स करा फक्ती ‘ही’ एक गोष्ट, मिळतील आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

 

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,891 नवीन रुग्ण, तर 16,577 जणांना डिस्चार्ज

 

फाटलेल्या टाचा काही दिवसातच होतील ‘मुलायम’, वापरा हे DIY Foot Mask

 

Pune News | शहरी गरिब योजनेच्या ‘लाभार्थीं’च्या नावे शहरात मालमत्ता, 622 कार्डधारकांना नोटीस; शहरातील ‘त्या’ 11 मोठ्या रुग्णालयात यापुढे शहरी गरिब योजना नाही !