हज यात्रेकरूसाठी लसीकरण व मार्गदर्शन शिबीर

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूसाठी पुणे महानगरपालिका व खुद्दमे हज्जाज, पुणे शहर जिल्हा हज कमिटी, यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत लसीकरण आयोजित करण्यात आले होते. खुद्दमे हुजजाज पुणे शहर हज समितीतर्फे हज येथे जाणाऱ्या यात्रेकरूसाठी हज येथे कराव्या लागणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, तेथील नियम व अटी कश्या असतात, त्याचे पालन कसे करावे याचे मार्गदर्शनपर शिबीर युनानी हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आले होते. खुद्दमे हुजजाज पुणे शहर जिल्हा हज समिती मागील १४ वर्ष पासून हजयात्रेकरूसाठी कार्यरत आहे. काझी मांझील नाना पेठ, पेन्शनवाला मस्जिद येते हे शिबिर होत आहे.
[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’869581c1-8831-11e8-908a-0f519f109b07′]

हज यात्रेसाठी जाव्या लागणाऱ्या सौदी अरेबिया देशात लसीकरण नसल्याने सौदी अरेबियामध्ये प्रवेश मिळत नाही. याकरिता पुणे मनपा व हज समिती यांच्या वतीने हज यात्रेकरूसाठी लसीकरण करण्यात आले. मेंदूजवर, पोलिओ, इन्फ्युलनजा इ आजारावरील लसीकरण करण्यात आले. मनपा आरोग्य प्रमुख डॉ.अंजली साबळे, डॉ.अमित शहा लसीकरण अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या शिबिरात हजयात्रा कशी केली जाते, त्याची संपुर्ण माहिती प्रात्यक्षिक स्वरूपात करून दाखविली जाते. शिबिरात माहिती देणारे मौलाना व मुफ्ती असतात. शिबिरात सौदी अरेबिया देशात मक्का व मीना हज्ज करण्याचे नियम व अटी काय आहेत तसेच त्याचे पालन कसे करावे हे शिकवले जाते. यात्रेच्या सहा महिने आगोदर यात्रेकरूचे ट्रेंनिग चालू होते. संपूर्ण भारतातुन १ लाख २५ हजार तर महाराष्ट्र मधून १२५०० व पुण्यातुन ८५० जण दरवर्षी हज यात्रेसाठी जात असतात, अशी माहिती यावेळी खुद्दमे हुजजाज पुणे जिल्हा हज समिती अध्यक्ष रियाझ काझी यांनी दिली.
[amazon_link asins=’B06Y66GKGN,B01B51Z58O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8d25a6aa-8831-11e8-b247-6b1e84e5d57c’]

जवळपास हज समितीचे ८५० यात्रेकरू व खाजगी टूर्सने जाणाऱ्या १२०० जणांनी लसीकरण केले. खुद्दमे हुजजाज हज समिती पुणे शहर जिल्हा हज समिती अध्यक्ष रियाझ काझी, अॅड. सलीम शेख, सरचिटणीस सईद खान, सह सरचिटणीस माहेबूब शेख, मोहंमद साद, हसन शेख उस्मान शेख, मन्सूर सय्यद, रफिक सय्यद, नवाब शेख रौफ शेख, हाजी हसीब काझी, अझीम गुडकूवाला, हुज्जजुल हरम सर्विसेसचे बसित शेख उपस्थित होते. हज जाणाऱ्या यात्रेकरूंनी यावेळीं हज समिती व पुणे मनपाचे आभार मानले.