Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  लसीच्या तुटवड्यामुळे राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यातच आता मुंबईतील एका हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी बोगस पद्धतीने लसीकरण (Vaccination Scam) सुरू असल्याचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर या नागरिकांनी आपल्याला बोगस लस (Vaccination Scam) दिली असल्याचेही म्हंटले आहे. दरम्यान, लसीकरण शिबिराचे (Vaccination camp) आयोजन करून ३९० जणांना लस दिली आहे. मात्र लस घेतल्यानंतर कोणताही मेसेज आला नाही त्याशिवाय ज्या रुग्णल्याचे प्रमाणपत्र दिले गेले त्या रुग्णालयाने आपण शिबिर घेतले नसल्याचे सांगितले आहे. यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिले आहे. दरम्यान , या प्रकारामुळे घाबरलेल्या नागरिकांनी यामध्ये सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. mumbai housing society vaccination scam fake covid shots

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

३० मे ला कांदिवली येथील हिरानंदानी इस्टेट सोसायटीत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं.
या शिबिरात ३९० नागरिकांना कोविशील्ड लस देण्यात आली.
या शिबिराची व्यवस्था राजेश पांडे या व्यक्तीने करून दिली होती.
त्याने स्वतःला कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचा प्रतिनिधी असल्याचं सोसायटीतील नागरिकांनी सांगितलं.
सोसायटी समितीच्या सदस्यांशी संपर्क राजेश पांडे याने केला होता.
तर संजय गुप्ता याने शिबीर घेतलं आणि महेंद्र सिंग यांने सोसायटीतील सोसायटी सदस्यांकडून रोख पैसे घेतले.
अशी माहिती या शिबिरात लस घेतलेल्या नागरिकांनी दिली आहे.

National Pension Scheme | पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर ! आता NPS मधून पूर्ण पैसे काढू शकता, जाणून घ्या

एका डोससाठी १२६० रुपये दिले. माझ्या मुलाने लस घेतली.
पण त्यानंतर त्याला कोणताही मेसेज आला नाही शिवाय लास घेतल्यानंतर फोटो देखील काढून देण्यात आले नाही.
प्रत्येक नागरिकाने लस घेण्यासाठी पैसे दिले आहेत.
त्यामुळे जवळपास पाच लाख रुपये दिले गेले असल्याचे शिबिरात लस घेणारे हितेश पाटील यांनी सांगितले.
लस घेतल्यानंतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.
आम्हाला प्रमाणपत्रही देण्यात आलं नाही.
त्यामुळे आम्हाला धक्का बसला असल्याचे ऋषभ कामदार यांनी सांगितलं.
दरम्यान या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करावा.
अशी मागणी संबंधित रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

प्रमाणपत्रावर रुग्णालयांकडून खुलासा

कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचं नाव सांगून लसीकरण शिबीर घेण्यात आलं होतं. वेगवेगळ्या रुग्णालयांच्या नावाने लसीकरण झालेल्या रहिवाशांना प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यात नानावटी, लाईफलाईन, नेस्को बीएमसी लसीकरण केंद्र आदीं रुग्णालयांचा समावेश होता. नागरिकांनी प्रमाणपत्र मिळालेल्या रुग्णालयांशी संपर्क केला. त्यावेळी सोसायटीमध्ये लस पुरवत नसल्याचं रुग्णालयांनी सांगितलं. तर नानावटी रुग्नालयनाई की निवेदन प्रसिद्ध केलं आहे. नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या (Nanavati Max Super Specialty Hospital) नावाने कांदिवलीतील हाऊस सोसायटीतील नागरिकांना लसीकरण प्रमाणपत्र दिली गेली असल्याचं अलिकडेच निदर्शनास आलं आहे. नागरी सोसायट्यांमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं लसीकरण शिबीर आयोजित करत नाही, हे स्पष्ट करत असून, या प्रकरणी संबंधित विभागाला माहिती देण्यात आली आहे आणि तक्रारही नोंदवत आहोत,असं नानावटी रुग्णालयाने स्पष्टीकरण दिल गेलं आहे.

 

Web Title : Vaccination Scam | mumbai housing society vaccination scam fake covid shots

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! मोदी सरकार देत आहे 4000 रूपये मिळवण्याची संधी, पहा डिटेल