corona vaccine : पुण्यात लसीकरणास प्रारंभ, पहिल्या दिवशी 438 जाणांना टोचली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना लसीकरणाचा आजपासून (शनिवार) पुण्यात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी जवळपास 438 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.

आरोग्य प्रमुख आशिष भारती यांनी सांगितले की, पुणे महापालिका अंतर्गत 8 केंद्रावर लसीकरण करण्यात आले. या केंद्रांमध्ये एकूण 800 लाभार्थींपैकी 470 हजर झाले. त्यापैकी 32 लोकांनी केंद्रावर येऊन लस घेण्यास नकार दिला व एकूण 438 लाभार्थ्यांना कोविशिल्ड ही लस देण्यात आली. पुण्यामध्ये एक ही अप्रिय घटना घडली नाही. काही घाबरले, तर काही जण ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या केंद्रावर लसीकरणासाठी आले होते. मात्र, वाट पाहून ते निघून गेले. त्यापैकी काहींना आम्ही बोलावून घेतले. काहीजण बोलावून देखील आले नसल्याचे डॉ. भारती यांनी सांगितले.

या रुग्णालयात झाले लसीकरण

1. कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतीगृह

2. कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ

3. ससून रुग्णालय, पुणे स्टेशन

4. सुतार दवाखाना, कोथरुड,

5. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एरंडवणा

6. रुबी हॉल क्लीनिक, ताडीवाला रस्ता

7. नोबेल हॉस्पिटल, हडपसर

8. भारती हॉस्पिटल, धनकवडी