Covid-19 vaccination : बाजारात 700 ते 1000 रुपयांत मिळू शकते कोरोना व्हॅक्सीन, किमतींची लवकरच होईल घोषणा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोना व्हॅक्सीनेशनच्या प्रक्रियेत लवकरच नवीन बदल होणार आहे. काही काळातच खुल्या बाजारात सुद्धा व्हॅक्सीन मिळू लागेल. असे म्हटले जात आहे की, बहुतांश व्हॅक्सीनची किंमत 700 रुपयांपासून एक हजार रुपये प्रति डोसपर्यंत असू शकते. सध्या सरकारला व्हॅक्सीन 250 रुपये प्रति डोसच्या दराने मिळत आहे. विशेष बाब ही आहे की, सरकार आगामी 1 मेपासून 18 वर्षावरील वयाच्या सर्व लोकांना व्हॅक्सीन देण्यास सुरुवात करत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, खासगी बाजारात व्हॅक्सीनची किंमत 700 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत प्रति डोस असू शकते. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सीरम इन्स्टीट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी अगोदर म्हटले होते की, कोविशील्डची किंमत एक हजार रुपये प्रति डोस असू शकते. तर रशियन व्हॅक्सीन स्पुतनिक-व्ही आयात करण्याच्या तयारी असलेले डॉक्टर रेड्डीज व्हॅक्सीनची किंमत 750 रुपयांच्या आत ठेवू शकतात. मात्र, याबाबत सध्या अंतिम निर्णय घेणे बाकी आहे.

अजूनपर्यंत अनेक कंपन्यांनी खुल्या बाजारात व्हॅक्सीनच्या किमतीबाबत घोषणा केलेली नाही. असे म्हटले जात आहे की, हे यावर अवलंबून असेल की ते खासगी बाजारात किती व्हॅक्सीन विकू शकतात. याशिवाय निर्यातीबाबत विचार आणि सप्लाय चेनचे मुद्दे सुद्धा किंमत ठरवण्यात महत्वाची भूमिका पार पाडतील. तसेच कंपन्या राज्यांना व्हॅक्सीन किंमतीसंबंधी मिळणार्‍या आदेशाबाबत केंद्र सरकारच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा करत आहेत.

दिले गेले 13 कोटी व्हॅक्सीन डोस
देशात व्हॅक्सीन कार्यक्रम जारी आहे. या दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी माहिती दिली आहे की, देशात व्हॅक्सीन डोस देण्याचा आकडा 13 कोटींच्या पुढे गेला आहे. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली आहे. सध्या देशात 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना व्हॅक्सीन दिली जात आहे. तर, सरकारने आगामी 1 मेपासून 18 वर्षावरील वयाच्या सर्व लोकांन व्हॅक्सीन देण्याची घोषणा केली आहे.