Vaccine Certificate | WhatsApp द्वारे डाऊनलोड करा COVID-19 व्हॅक्सीन सर्टिफिकेट, जाणून घ्या एकदम सोपी पध्दत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Vaccine Certificate | जर देश-विदेशात कुठेही जायचे असेल तर COVID-19 व्हॅक्सीन सर्टिफिकेट सध्या खुप महत्वाचे आहे. आतापर्यंत कोविड-19 व्हॅक्सीन सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याच्या दोन पद्धती होत्या – पहिली CoWIN पोर्टल आणि दुसरी आरोग्य सेतू अ‍ॅप. आता भारत सरकारने WhatsApp सोबत भागीदारी केली आहे. ज्यामुळे व्हॅक्सीन सर्टिफिकेट डाऊनलोड (Vaccine Certificate Download) करणे आणखी सोपे झाले आहे.

आता तुम्ही MyGov कोरोना हेल्पडेस्क WhatsApp चॅटबोटवरून डाऊनलोड करू शकता. याची घोषणा सरकारने मागील वर्षी केली होती. व्हॉट्सअपद्वारे COVID-19 व्हॅक्सीन सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत जाणून घ्या…

यासाठी अगोदर MyGov कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअप नंबर तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करावा लागेल. हा नंबर 9013151515 आहे.

नंबर सेव्ह झाल्यानंतर व्हॉट्सअप अ‍ॅप उघडा.

यानंतर चॅट लिस्टमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट सर्च करा.

मिळाल्यानंतर चॅट उघडा आणि डाऊनलोड सर्टिफिकेट टाईप करा.

आता व्हॉट्सअप चॅटबोट रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सिक्स डिजिट ओटीपी पाठवेल.

यानंतर चॅटबोट कोविड-19 व्हॅक्सीन सर्टिफिकेट पाठवेल. येथून ते डाऊनलोड करा.

जर इथे व्हॉट्सअप एरर दाखवत असेल तर तुम्ही पहिल्या प्रमाणे कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतु अ‍ॅपवर सुद्धा जाऊ शकता.

Web Title :- Vaccine Certificate | how to download covid 19 vaccine certificate via whatsapp check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

High Blood Pressure | उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दररोज या पध्दतीनं जांभळाच्या बियांचं करा सेवन, जाणून घ्या

Monsoon Diet | पावसाळ्यात आरोग्यदायी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा करा समावेश, जाणून घ्या

Shirur Crime | शिरूरचे माजी सभापती प्रकाश पवार यांच्यावर गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण