Coronavirus : ‘कोरोना’वर विकसित केली ‘लस’, इस्त्रायलच्या शास्त्रज्ञांचा मोठा ‘दावा’

जेरुसलेम : वृत्त संस्था  – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार उडवून दिला असतानाच एक आनंदाची बातमी आले आहे. इस्त्रायलमधील शास्त्रज्ञांनी या जीवघेण्या कोरोना व्हायरसवर लस विकसित केल्याचा दावा केला आहे. कोरोना व्हायरस कोविड -१९ च्या लस ची अधिकृत घोषणा पंतप्रधानाच्या कार्यालयातून होण्याची शक्यता आहे.

इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाच्या देखरेखी खाली काम करणारे इन्स्ट्यिुट फॉर बायोलॉजिकल रिसर्चमधील शास्त्रज्ञांना कोरोना व्हायरसचे गुण आणि जैविक तंत्रज्ञान समजून घेण्यात मोठे यश आले आहे. आता त्यावर वैज्ञानिक क्षमतेसह एंटी बॉडीज लस विकसित करण्यात आली आहे.
विकसित करण्यात आलेल्या लसीवर महत्वपूर्ण परिक्षण आणि प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच ही लस रुग्णांसाठी किती सुरक्षित आहे, हे स्पष्ट होणार आहे. याबाबतचे वृत्त इस्त्रायलच्या एका वेबसाईटने मेडिकल सुत्रानुसार दिले आहे.

युरोपियन देशांमध्ये ३५ कंपन्यांनी औषधं बनविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. युके सरकारने कोरोना व्हायरसच्या लसीसाठी निधीही दिला आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, व्हाईटचॅपेल मधील क्विन मेरी बायोएंटरप्रायझेस इनोव्हेशन सेंटरनेही कोरोना व्हायरसविरोधातील लस शोधली आहे. या लसीच्या चाचणीसाठी २४ लोकांना बोलविले आहे. जो कोणी या लसीची चाचणी स्वत:वर करुन घेईल, त्याला ३५०० पाऊंड म्हणजे ३ लाख रुपये दिले जाणार आहे.

जी व्यक्ती या चाचणीत सहभागी होईल. त्यांच्या शरीरात कोरोना व्हायरसचा कमजोर असा स्ट्रेन टाकला जाईल. ज्यामुळे त्या व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरस संक्रमणाची शक्यता वाढते. जेव्हा कोरोना व्हायरसचा प्रभाव या व्यक्तीवर दिसून येईल, तेव्हा त्याच्यावर एचव्हीव्हो कंपनीने तयार केलेल्या लसीची चाचणी केली जाईल.