खासगी रुग्णालयात सगळ्यात महाग मिळते कोरोना प्रतिबंधक लस, किंमत किती? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात कोरोना विषाणूने थैमान घातले असून दैनंदिन बाधितांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने १८ वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरवात केलीय. मात्र, अजूनही लसीच्या दरावरून गोंधळ निर्माण होताना दिसत आहे. खासगी रुग्णालयांना २५० रुपयांना देण्यात आलेल्या लसीचा दर आता वाढला आहे. देशात सीरमची कोव्हीशील्ड लसीचा दर ७००-९०० रुपयांपर्यंत आहे. तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा दर १२५०-१५०० पर्यंत आहे.

कोविन वेबसाइटवरून असे समजते की, या खाजगी क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या ४ मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांची नावे पुढे आली आहेत. तर ते म्हणजे, अपोलो, मॅक्स, फोर्टिस आणि मनिपाल या रुग्णालयांचा समावेश आहे. अनेक देशामध्ये कोव्हीड लसीच्या दराबाबत एकसारखेपणा नाही, भारत सुद्धा त्या देशांपैकी एक आहे. कॅव्हिडचा वाढता प्रादुर्भाव बघता देशातील मोठा भाग कोव्हीड लसीकरणासाठी स्वतःच्या खिशातून पैसे द्यालाही तयार नाही. अशी माहिती समोर आलीय. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे देशातील खासगी लसीचा वाढत दर आहे. तर कोव्हिशिल्डचा एक शॉट घेण्यासाठी जवळजवळ १२ डॉलर्स आणि कोव्हॅक्सिनसाठी १७ डॉलर्स द्यावे लागत आहेत. लस सुरु करण्याच्या सुरवातीला केंद्र सरकार लसीच्या २ डोससाठी केवळ १५० रुपये देत होते. तर, राज्य सरकार आणि खासगी हॉस्पीटलयाना पुरवठा करत होते.

दरम्यान, खासगी रुग्णालयामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रति डोस १०० रुपये घेण्याची संमती दिलीं होती. खासगी रुग्णालयांनी देखील यावर सहमती दर्शविली होती. या दरम्यान, काही रुग्णालये लसीकरण शुल्क म्हणून कोव्हिशिल्ड लसीसाठी २५०-३०० रुपये प्रति डोस रक्कम आकारत आहेत. तसेच, आतापर्यंत कोव्हिशिल्डचा दर ६६० ते ६७० रुपये होता. यामध्ये GST आणि अन्य खर्च समाविष्ट होता. तर ज्यावेळी लसीची आयात केली जाते तेव्हा ५ ते ६ टक्के लास खराब होते. असा स्थितीमध्ये लसीचा दर ७१० ते ७१५ पर्यंत होता. अशी माहिती मॅक्स हॉस्पिटलच्या एका प्रवक्त्यानी दिली आहे.

यानंतर, जे कामगार लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देतात, त्या कर्मचाऱ्यांना PPE किट, हॅन्ड सॅनिटायझर, बायोमेडिकलची व्यवस्था दिली जाते, यासाठी १७०-१८० रुपये खर्च होतात. अशामुळे एका लसीचा दर ९०० रुपयापर्यंत जातो. परंतु रुग्णालये हीच लास कोणत्या दराने नागरिकांना देणार याचा अजून खुलासा झालेला नाही असे मॅक्स हॉस्पिटलच्या प्रवक्त्यानी सांगितले आहे. या दरम्यान, भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लस १२०० तर सिरमची ६०० रुपयाची घोषणा झाली होती मात्र, आत्ता या कंपन्या कोरोना प्रतिबंधक लस दुपटीने राज्यात देत आहेत.